Nandurbar Fire Accident : तितरी येथे ट्रकची वीजखांबाला धडक; भीषण आग

Nandurbar Fire Accident
Nandurbar Fire Accidentesakal
Updated on

Nandurbar Fire Accident : तितरी (ता. शहादा) येथे तितरी-पानसेमल रस्त्यालगत ट्रकचा धक्का लागून विजेचा खांब पडल्याने शॉर्टसर्किट होऊन कापसाच्या काड्यांच्या ढिगाऱ्याला आग लागल्यामुळे एकच धावपळ उडाली. (pile of cotton sticks caught fire due to falling electric pole nandurbar fire accident news)

आगीने रौद्र रूप धारण केल्याने तत्काळ शहादा व पानसेमल (मध्य प्रदेश) येथील अग्निशमन दलाला पाचरण करून आग आटोक्यात आणली. वीज वितरण कंपनीकडून तत्काळ वीजपुरवठा बंद करण्यात आला. सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. ही घटना मंगळवारी (ता. १३) घडली.

लोंबकळणाऱ्या तारांचा ट्रकला स्पर्श होऊन तारा व खांब खाली पडले. वायरिंगच्या स्पार्किंगमुळे आग लागून सोसाट्याच्या वाऱ्याने मोठी भडकली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nandurbar Fire Accident
Nandurbar Fire Accident : कलमाडी तह येथे सिलिंडरचा भीषण स्फोट; आगीत संसारोपयोगी वस्तू खाक

आगीच्या ज्वाला रस्त्याच्या पलीकडे येऊ लागल्याने जवळील नागरिकांमध्ये भीती पसरली.

त्या वेळी काही नागरिकांनी व सरपंचांनी पंचायत समिती सदस्या रोहिणी पवार यांच्या प्रतिनिधींना दूरध्वनी केला. त्यांनी तत्काळ शहादा येथील बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांना फोन करून आगीबाबत माहिती दिली.

श्री. पाटील यांनी शहादा येथून अग्निशमन बंब पाठविला, तर सौ. पवार यांच्या प्रतिनिधिंनी पानसेमल येथून अग्निशमन बंब पाचारण केले व आग आटोक्यात आणली.

Nandurbar Fire Accident
Nashik Fire Accident : अंबड औद्योगिक वसाहतीतील पेंट शोरूमला आग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.