Dhule News : शतकोत्तरी पिंपळनेर ग्रामपंचायतीचे लवकरच नगर परिषदेत रूपांतर होणार असल्याची माहिती आमदार मंजुळा गावित यांनी दिली. या मागणीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याने त्यांचे आमदारांनी आभार मानले. (Pimpalner City Council soon in dhule news)
पिंपळनेरला नगर परिषद व्हावी, अशी अनेक वर्षांपासून मागणी होती. यास मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री शिंदे यांनी मंगळवारी (ता. ५) मान्यता दिल्याची माहिती आमदार गावित यांनी दिली. त्यासाठी आमदार २७ सप्टेंबर २०२१ ला पहिला प्रस्ताव दिला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ग्रामसभा, साक्री पंचायत समितीसह जिल्हा परिषद स्थायी समितीचा ठराव, भूमिअभिलेख कार्यालयाकडून पूरक नकाशे, लोकसंख्या, नगर परिषदेसाठी अपेक्षित ना हरकत प्रमाणपत्र, अकृषक रोजगाराची टक्केवारी, जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय आदी पाठपुराव्यातून संकलित करून २३ ऑगस्ट २०२३ ला परिपूर्ण प्रस्ताव मुख्यमंत्री, नगरविकासच्या उपसचिवांकडे सादर केला.
त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याची माहिती आमदार गावित यांनी दिली. नगर परिषदेत रूपांतरानंतर विकास निधी मिळविण्यासाठी हद्दवाढीसह रस्ते, पूल, पथदीप, पाणी आदी सोयी-सुविधा, विकासाचे दालन खुले होऊ शकेल, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, आमदार गावित यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.