Nandurbar : आईच्या स्मरणार्थ 500 आंब्याच्या झाडांची लागवड

Ramesh came, Bhushan came while starting the planting resolution.
Ramesh came, Bhushan came while starting the planting resolution.esakal
Updated on

तळोदा (जि. नंदुरबार) : तालुक्यातील कोठार येथील अनंत ज्ञानदीप आश्रमशाळेतील शिक्षक भूषण येवले यांनी आईच्या स्मरणार्थ केलेला ५०० आंब्यांच्या झाडाच्या लागवडीचा (Tree plantation) संकल्प गुरू पौर्णिमेनिमित्त (Guru pornima) वास्तवात उतरवला आहे. सहकाऱ्याच्या मदतीने कोठार गावातील पडीक जागेत व शाळेच्या आवारात पाचशे आंब्याची लागवड करण्यात आली. (Plantation of 500 mango trees in memory of mother nandurbar Latest Marathi news)

Ramesh came, Bhushan came while starting the planting resolution.
13 वर्षीय बालकाचा मृतदेह आढळला; पंधरा फूट खोल खाणीत बुडून मृत्यू

भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत वाणी, भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वनाथ कलाल, श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे संचालक रमेश येवले, भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र राजपूत, जंगलसिंग पाडवी, भूषण येवले आदी उपस्थित होते. रमेश येवले यांनी ५०० आंब्याच्या झाडांची लागवडीमागील भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेचे उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी सुरवातीला डॉ. शशिकांत वाणी, विश्वनाथ कलाल, रमेश येवले, राजेंद्र राजपूत, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक सी. एम. पाटील, भूषण येवले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने गावात व परिसरातील मोकळ्या जागेत या ५०० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हंसराज महाले यांनी केले.

Ramesh came, Bhushan came while starting the planting resolution.
Domestic Violence : 3 लाखांसाठी विवाहितेचा छळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.