धुळे : पीएमएसए निधी (स्वनिधी) योजनेंतर्गत धुळे महापालिकेतर्फे दोन हजार ४५४ लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील, तर ५८६ लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील कर्ज वितरित झाले आहे.
दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील ५० हजारांच्या कर्जासाठी लाभार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन महापौर, आयुक्तांसह इतर पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी केले आहे. (PM Svanidhi Yojana Loan disbursement to two half thousand beneficiaries Apply for third phase loan dhule news)
शहरातील पथविक्रेता, फेरीवाले/दूध, भाजीपाला, चहा हॉटेल, नाश्ता गाडी, कटलरी, पानटपरी, फूल विक्रेता आदी वस्तू विक्रेत्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्ज मंजूर केले आहे. एकूण दोन हजार ९५९ लाभार्थ्यांना बँकेने कर्ज मंजूर केले असून, त्यांपैकी दोन हजार ४५४ लाभार्थ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे.
तसेच प्रथम टप्प्यात दहा हजार कर्ज उपलब्ध झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २० हजार रुपये बँक देते. यात आतापर्यंत ५८६ लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील २० हजार रुपये कर्ज वितरित झाले आहे.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
५० हजारांसाठी अर्जादरम्यान दुसऱ्या टप्प्यातील कर्जफेडीनंतर लाभार्थ्याला तिसऱ्या टप्प्यातील ५० हजार रुपये कर्ज दिले जाते. यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे. https://pmsvanidhi.mohua.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावा.
ई-सेवा केंद्रातून हा अर्ज भरावा. शहरातील जास्तीत जास्त पथविक्रेते/फेरीवाल्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर प्रतिभा चौधरी, आयुक्त देवीदास टेकाळे, महापौर नागसेन बोरसे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, महिला ल बालकल्याण समिती सभापती सारिका अग्रवाल, विरोधी पक्षनेत्या कल्पना महाले, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, विजय सनेर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.