धुळे : शहरातील संवेदनशील आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणाऱ्या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घरफोडीच्या दोन घटनांचा उलगडा झाला. तसेट चोरीच्या दोन दुचाकीदेखील जप्त केल्या. तिघांपैकी दोन संशयित विधिसंघर्षित बालके आहेत. (Police arrest suspects who committed theft in Azad Nagar police station limits 2 suspected juvenile dhule news)
शहरातील अमिन उस्मान शेख (रा. गल्ली क्रमांक ३, धुळे) हा ३१ जानेवारीला रात्री अकराच्या सुमारास राहत्या घराला कुलूप लावून नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी गेले असता चोरट्यांनी शेख यांचे घर फोडले. घरातून २१ हजारांचे दागिने तसेच दोन हजार ७०० रुपयांची भांडी चोरट्यांनी लंपास केली.
तसेच जावेद सलीम खाटीक (रा. भोला बाजार, धुळे) यांचे घर फोडून त्याच रात्री चोरट्यांनी आठ हजारांची भांडी, मोबाईल आणि भिशीचे पैसे लंपास केले. दोन्ही घटनांची नोंद आझादनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली.
आझादनगरचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोधपथकाने घटनास्थळाला भेट देत चौकशीस सुरवात केली. सोहेल मजिद मन्सुरी (रा. शिवाजीनगर, धुळे) आणि त्याच्या सोबत विधिसंघर्षित बालकाने या घरफोड्या केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
चोरीचा १६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल त्यांनी दिला. तसेच जुम्मन गफ्फार शाह (रा. वडजाई रोड, गल्ली क्रमांक १, धुळे ) २९ जानेवारीला रात्री साडेआठच्या सुमारास गल्ली क्रमांक चारमध्ये नमाजपठणासाठी गेले असता त्यांची दुचाकी (एमएच १८, डीबी ९१७४) चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी तपास करताना आझादनगर पोलिसांनी १६ वर्षीय विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.
त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून दुचाकी जप्त केली. अन्य विनाक्रमांकाची दुचाकीदेखील संशयिताने बेवारस सोडून दिली होती. तीही जप्त केली. यात ५६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, योगेश शिरसाट, बापू कोकणी, अविनाश लोखंडे, शोएब बेग, आतिक शेख, एस. एन. मोरे, एस. पी. शेंडे, संदीप कड्रे, योगेश शिंदे यांनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.