Dhule Crime : चोरीच्या 6 दुचाकी जप्त; पोलिसांची युवकाला अटक

Shirpur: Inspector AS Agarkar and officials of the search team along with seized bikes and suspects.
Shirpur: Inspector AS Agarkar and officials of the search team along with seized bikes and suspects.esakal
Updated on

शिरपूर (जि. धुळे) : नाशिक व शिरपुरात दुचाकी चोरून डोंगराळ भागात लपवून ठेवणाऱ्या संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या.पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या आदेशाने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री ते पहाटे दरम्यान ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे (police arrested young man for stealing bikes dhule crime)

२१ जानेवारीला रात्री शहरातील करवंद नाका परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू असताना पोलिसांना पाहून भरधाव वेगात दुचाकी पळवून फरारी होण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला शोध पथकाने ताब्यात घेतले.

चौकशीअंती त्याचे नाव शक्तीसिंह चेनसिंह सरदार (वय २८) असल्याचे निष्पन्न झाले. त्याने मध्य प्रदेशातील दतिया येथील रहिवासी असून सध्या महादेव जवईपाडा (ता. शिरपूर) येथे राहत असल्याचे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या हिरो सुपर स्प्लेंडर (एमएच १८, बीबी २७८३) ची कागदपत्रे तपासली असता वाहन चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Shirpur: Inspector AS Agarkar and officials of the search team along with seized bikes and suspects.
Dhule News : योजना 154 कोटींची; तरीही जलकुंभ कोरडेच? शिवसेनेच्या ठाकरे गटाचा वार कोणावर?

त्यामुळे त्याला शहर पोलिस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता त्याने आणखी काही दुचाकी चोरल्या असून महादेव जवईपाडा येथे लपवून ठेवल्याची कबुली दिली. डोंगराळ भागातील गावात जाऊन शोधपथकाने हिरो स्प्लेंडर, बजाज पल्सर, हिरो एचएफ डीलक्स व होंडा शाईन अशा कंपन्यांच्या सहा दुचाकी जप्त केल्या.

त्यांची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे. त्यापैकी दोन दुचाकी शिरपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तर एक दुचाकी आडगाव (नाशिक) येथून चोरल्याचा गुन्हा उघडकीस आला. संशयिताकडून चोरीचे आणखी काही गुन्हे उघड केस येण्याची शक्यता आहे.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर अधीक्षक किशोर काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर, शोध पथकाचे उपनिरीक्षक किरण बाऱ्हे, हवालदार ललित पाटील, लादुराम चौधरी, पोलिस नाईक मनोज पाटील, गोविंद कोळी, विनोद आखडमल, प्रवीण गोसावी, मुकेश पावरा, प्रशांत पवार, गृहरक्षक दलाचे नाना अहिरे, मिथुन पवार, चेतन भावसार, शरद पारधी यांनी ही कारवाई केली.

Shirpur: Inspector AS Agarkar and officials of the search team along with seized bikes and suspects.
Salve Crime Case : जखमी साक्षीदार साळवेची धुळ्यात उलटतपासणी पूर्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.