Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या वतीने नेहमी होत असतो. (police department found culprit of dead children in accident and arrested him nandurbar news)
मात्र प्रकाशा येथील अपघातात मृत मुलांच्या गुन्हेगाराला शोधून त्याला जेरबंद करून मृत युवकाला न्याय मिळवून देणाऱ्या पोलिस विभागाचा सत्कार जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात झाल्याचा प्रसंग प्रथमच घडून आला.
तळोदा तालुक्यातील प्रकाशा येथील मृत रोहन मुसळे यांचा एका वाहनाच्या अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेतील वाहनाचा क्रमांकसुद्धा माहिती नसताना तळोदा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक बागूल, कर्मचारी गौतम बोराळे, अजय पावरा, पोलिस नाईक विजय विसावे यांनी त्या वाहनावरील ‘कार्तिक’ या शब्दावरून शोध घेत, थेट परराज्यातून गुन्हेगाला शोधून जेरबंद केले. तळोदा पोलिसांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीचे रोहन मासुळे यांच्या कुटुंबाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या वेळी पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील म्हणाले, की पोलिसांकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. आपण खाकी वर्दीच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो.
पोलिस म्हणून आपल्याला संविधानाने अनेक अधिकार प्रदान केलेले आहेत. त्याचा वापर करून जनतेची व देशाची सेवा करणे हे आपले व्रत आहे. देशाच्या सुरक्षेकरिता जे जे गरजेचे आहे ते सर्व जवान म्हणून आपण कर्तव्य भावनेने करावे.
या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत, नरेंद्र गुरव, शरद वाणी, सुधाकर मराठे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.