Nandurbar Crime News : गोरक्षकांवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी करून पोलिस अधीक्षकांना २१ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाने दिले आहेत, अशी माहिती गोरक्षक केतन रघुवंशी व त्यांचे वकील ॲड. रोहन गिरासे यांनी पत्रकार परिषदेत दिली.(Police fined 21,000 for filing false case nandurbar crime news)
याबाबत माहिती देताना ॲड. गिरासे म्हणाले, की १२ मार्च २०२२ ला नंदुरबार ते दोंडाईचा रस्त्यावर रनाळा गावाजवळ ५०० गोवंश भरलेले वाहन पकडले होते. हा पिक-अप (एमएच ३९, एडी १७३७) गोवंशाची कातडी असल्याबाबतची माहिती केतन रघुवंशी यांनी तालुका पोलिस ठाण्याला संपर्क करून दिली असता पोलिसांना घटनास्थळावर बोलविण्यात आले होते.
पोलिस जागेवर आल्यानंतर वाहनचालकाजवळ कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याजवळ कुठलेही बिल नसल्यामुळे हे वाहन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात कार्यवाहीसाठी आणले होते. त्या वेळी या गाडीवर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून केतन रघुवंशी यांनी फिर्याद दिली होती; परंतु १८ मार्च २०२२ ला हे वाहन कुठलीही कायदेशीर कारवाई, बिल न घेता पोलिस ठाण्यातून सोडण्यात आले.
त्यामुळे केतन रघुवंशी यांनी प्रसारमाध्यमांमध्ये बातमी दिल्यामुळे नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा राग मनात धरत १६ मार्च २०२२ ला वाहनमालकाला बोलावून रस्त्यावर गाडी अडवून दहशत निर्माण केली, असा खोटा गुन्हा दाखल केला व तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश चौधरी यांनीदेखील बातमी दिल्याच्या रागातून पोलिसांची बदनामी केली म्हणून खोटा गुन्हा दाखल केला होता, असे सांगत या कारवाईचा आधार घेत केतन रघुवंशी यांनी त्यांच्या मूलभूत अधिकारांचे हनन झाले म्हणून महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची चौकशी करून महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाने निकाल देताना पोलिस अधीक्षकांना तक्रारदार केतन दिलीप रघुवंशी यांना रक्कम २१ हजार रुपये इतकी रक्कम एक महिन्याच्या आत नुकसानभरपाई द्यावी, तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेशित केले आहे. तक्रारदारांतर्फे ॲड. रोहन गिरासे यांनी बाजू मांडली.
''मानवी हक्क आयोगाने आदेश दिले आहेत. त्या प्रकरणाची योग्य तपासणी करून त्यानंतर पुढील अपील करायचे की कसे काय त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.''-पी. आर. पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, नंदुरबार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.