Nandurbar Crime News : पोलिसांनी उतरवली 73 मद्यपी वाहनचालकांची थर्टीफर्स्टची झिंग

संपणाऱ्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आबालवृद्ध सज्ज असतात.
In view of the New Year visiting the blockade sites in the district and giving instructions to the police officials
In view of the New Year visiting the blockade sites in the district and giving instructions to the police officials esakal
Updated on

Nandurbar Crime News : संपणाऱ्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आबालवृद्ध सज्ज असतात. याच पार्श्वभूमीवर समाजकंटक व गुन्हेगारांवर अंकुश राहावा यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात नाकाबंदी राबविण्यात आली.

त्यात पोलिसांनी ७३ मद्यपी वाहनचालकांची थर्टीफर्स्ट पार्टीची झिंग उतरविली.

सत्तावीस ठिकाणी नाकाबंदी

नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात एकूण २७ ठिकाणी नाकाबंदी राबविण्यात आली. जिल्हा पोलिस दलातील ३२ पोलिस अधिकारी व १०५ पोलिस अंमलदार नेमण्यात आले होते. तसेच नाकाबंदीचे नेतृत्व करून पोलिस अधीक्षक पाटील, तसेच अपर पोलिस अधीक्षक तांबे स्वत: नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी देत होते.

१,१४१ वाहनांची तपासणी

नाकाबंदीदरम्यान एक हजार १४१ वाहनांची तपासणी करून मोटार वाहन कायद्यान्वये एकूण २७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ११ हजार ९०० रुपये किमतीचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नंदुरबार शहरात तलवार जप्त

नंदुरबार शहरात योगेंद्र ऊर्फ दादू मराठे (वय २२, रा. मोठा मारुती मंदिराच्या मागे, नंदुरबार) बेकायदेशीरपणे लोखंडी तलवार बाळगताना मिळून आला. त्याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अक्कलकुवा येथे मोलगी नाक्यावर भूपेंद्रभाई जुगऱ्या वळवी (३९, रा. रानाशी, ता. कुकरमुंडा, जि. तापी, गुजरात) याच्या ताब्यात मिळून आलेल्या मोटारसायकलबाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

In view of the New Year visiting the blockade sites in the district and giving instructions to the police officials
Nashik Crime: सामनगाव परिसरात साडीचा फॉल घेण्याच्या बहाण्याने आला अन्‌ महिलेवर वार करून दागिने हिसकावले

यांनी केली कारवाई

ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, नंदुरबार उपविभागीय पोलसि अधिकारी संजय महाजन, शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, अक्कलकुवा उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी केली.

नाकाबंदी कारवाई

नंदुरबार शहर पोलिस ठाणे ११, उपनगर पोलिस ठाणे ४, नंदुरबार तालुका पोलिस ठाणे २, नवापूर पोलिस ठाणे ३, विसरवाडी पोलिस ठाणे ३, शहादा पोलिस ठाणे-१७, धडगाव पोलिस ठाणे २, म्हसावद पोलिस ठाणे ५

सारंगखेडा पोलिस ठाणे २, अक्कलकुवा पोलिस ठाणे ९, तळोदा पोलिस ठाणे ५, मोलगी पोलिस ठाणे २ शहर वाहतूक शाखा ८ अशा एकूण ७३ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

"दारू पिऊन वाहन चालविताना आढळलेल्या वाहनचालकांचे परवाने (लायसन्स) निलंबन करण्याचे प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नंदुरबार यांच्या कार्यालयात पाठविण्यात येणार असून, लवकरच त्यांच्यावर परवाने निलंबनाची कारवाई करण्यात येईल." -पी. आर. पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, नंदुरबार

In view of the New Year visiting the blockade sites in the district and giving instructions to the police officials
Dhule Crime News : ड्रंक अँड ड्राइव्ह’चे 91 गुन्हे; पोलिसांची नाकाबंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.