Dhule Crime News : गावठी हातभट्टी दारूचा रसायनसाठा उद्‍ध्वस्त; पोलिसांकडून कारवाई

Police personnel along with Police Sub-Inspector Prasad Raundal were present during the operation on Gavathi Hatbhatti Liquor Factory in Shivarat.
Police personnel along with Police Sub-Inspector Prasad Raundal were present during the operation on Gavathi Hatbhatti Liquor Factory in Shivarat.esakal
Updated on

Dhule Crime News : साक्री पोलिसांनी म्हसदी परिसरात गावठी हातभट्टीच्या दारूच्या कारखान्यावर कारवाई केली असता सुमारे सात लाख दहा हजार किमतीचे रसायन नष्ट करण्यात आले.

पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत ही कारवाई केली.(Police officers destroyed chemical stock of liquor in village dhule crime news )

म्हसदी गाव शिवारातील जंगलात एक व्यक्ती गावठी हातभट्टी लावून दारू पाडण्याचे काम करत असल्याची माहिती निरीक्षक निकम यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक मोतीराम निकम यांनी पोलिस पथकाला पाठवून खात्री केली असता म्हसदी गावातून काळगाव रोडने रस्त्याच्या कडेला जंगलात जाणारी पायवाट दिसून आली.

तेथून जंगलात दक्षिणेस एक किलोमीटरवर हातभट्टी लावलेली दिसली. तेथून सुमारे २०० मीटरवर अजून दोन हातभट्ट्या दिसून आल्या. त्याशेजारीच एक व्यक्ती दारू बनवत असल्याचे दिसले. त्याने पोलिसांना पाहताच तेथून पळ काढला. संजय रामदास माळीच (रा. म्हसदी) असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Police personnel along with Police Sub-Inspector Prasad Raundal were present during the operation on Gavathi Hatbhatti Liquor Factory in Shivarat.
Dhule Crime News : अवैध गॅस सिलिंडरसह मुद्देमाल जप्त; अपर तहसीलदारांच्या पथकाची कारवाई

यानंतर हातभट्ट्यांवर पथकाने छापा टाकला असता सुमारे सात लाख दहा हजार रुपयांचे गावठी हातभट्टीचे दारू बनविण्याचे रसायन व साधन साहित्यासह तयार झालेली गावठी हातभट्टीची दारू मिळाली. ती पंचांसमक्ष जागीच नष्ट केली. या प्रकरणी संजय माळीच याच्याविरुद्ध साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मोतीराम निकम, पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ, विक्रांत देसले, दीपक विसपुते, शांतिलाल पाटील, तुषार जाधव, अर्जुन खलाणे आदींच्या पथकाने केली.

Police personnel along with Police Sub-Inspector Prasad Raundal were present during the operation on Gavathi Hatbhatti Liquor Factory in Shivarat.
Dhule Crime News : एलसीबीकडून गावठी कट्टा जप्त; संशयित तरुणाला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.