Dhule Crime News : शहरातील वाडीभोकर रोडवर ‘कॅफे’च्या नावाखाली महाविद्यालयीन तरुण-तरुणींना अशोभनीय कृत्य करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या तीन कॅफेवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी (ता.१६) कारवाई केली.
या कारवाईत असभ्य वर्तन करणाऱ्या तरुण-तरुणींना पकडून पालकांच्या स्वाधीन केले. (Police raid on 3 cafes in Deopur dhule crime news)
याप्रकरणी कॅफे चालकांवर पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शहरातील देवपूर भागातील वाडीभोकर रोडवरील विनायक नगर मधील ‘द कॅश’ कॅफे, ‘बँक बँचर’ कॅफे, ‘ट्वेल टेबल’ कॅफे येथे तरुण-तरुणींचे अश्लील कृत्ये व गैरप्रकारास उत्तेजन देत असल्याबाबत गुप्त माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिस अधीक्षक श्री. धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
गुन्हे शाखा व पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या पथकाने एकाच वेळी तिन्ही कॅफेंवर छापा टाकला. या ठिकाणी तरुण-तरुणींचे आठ जोडपे अशोभनीय वर्तन करताना आढळले. कॅफेमध्ये तरुण-तरुणींना अश्लील हावभाव अथवा असभ्य कृत्य करण्यास सुलभता व्हावी यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच तासाप्रमाणे २०० ते ३०० रुपये त्यांच्याकडून आकारले जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी कॅफे मालकांना परवान्याचे उल्लंघन करून गैरप्रकारास उत्तेजन दिल्याबद्दल ताब्यात घेतले.
पोलिस अधीक्षक श्री. धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. शिंदे, पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक संगीता राऊत, योगेश राऊत, अमरजित मोरे, बाळासाहेब सूर्यवंशी, जमादार दिलीप खोंडे, संजय पाटील, प्रकाश सोनार, संदीप पाटील, हेमंत बोरसे, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, प्रल्हाद वाघ, चेतन बोरसे, जितेंद्र वाघ, प्रशांत चौघरी, जगदीश सूर्यवंशी, हर्शल चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पालकांना आवाहन
संबंधित तरुण- तरुणींच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना बोलविण्यात आले. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तरुण-तरुणींच्या पालकांना पाल्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर समज देऊन तरुण-तरुणींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.