Dhule Crime News : स्वर्ण पॅलेसमध्ये चोरी; पोलिसांतर्फे ‘टॅटू’वरून गुन्ह्याची उकल

police station team solved theft crime on basis of tattoo Dhule Crime News
police station team solved theft crime on basis of tattoo Dhule Crime Newsesakal
Updated on

Dhule Crime News : शहरातील आग्रा रोडवरील स्वर्ण पॅलेस या सराफ दुकानात ९ जुलैला चोरट्यांनी तब्बल ८९ लाखांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले होते. त्यापूर्वी तीन चोरट्यांनी तीन दिवस आधी रेकी केली होती.

या प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने ‘टॅटू’वरून या गुन्ह्याची उकल केली. तसेच दोघांना अटक केली असून, तिसऱ्याचा शोध सुरू आहे. या कामगिरीची प्रशंसा करत जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश येईल, असा विश्‍वास पत्रकार परिषदेत व्यक्त केला. (police station team solved theft crime on basis of tattoo Dhule Crime News)

एकीकडे मुख्यमंत्र्यांचा दौरा असताना तिघा चोरट्यांनी वर्दळीच्या आग्रा रोडवरील सराफ बाजारातील स्वर्ण पॅलेसमध्ये हातसफाई केली होती. या प्रकरणी प्रकाश जोरावरमल चौधरी (रा. नित्यानंदनगर, नटराज टॉकीजजवळ, धुळे) यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला.

यानंतर आझादनगरच्या पोलिस पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपासाला गती दिली. यात संशयिताच्या हातावरील टॅटू आणि पांढऱ्या‍ रंगाची स्लिपरवरून तपास चक्रे फिरली. वेग दिला.

दोघांना मुद्देमालासह अटक

किशोरसिंग टाक (रा. जालना) याने त्याच्या दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची माहिती आझादनगरचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. त्यानुसार पथकाने जालना शहर गाठत किशोरसिंग रामसिंग टाक (वय २५, रा. गुरुगोविंदनगर, शिवाजीनगरजवळ, जालना) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गुन्हा इतर दोन साथीदारांच्या मदतीने केल्याचे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

police station team solved theft crime on basis of tattoo Dhule Crime News
Nashik Kalkam Fraud Crime : ‘कलकाम’च्या मालमत्तेवर टाच; पैसे संकलित करणाऱ्या एजंटांचा शोध

पोलिस पथकाने दुसरा साथीदार झेनसिंग ऊर्फ लकी जिबनसिंग जुन्नी (वय २८, रा. नवनाथ मंदिराजवळ, हरिविठ्ठलनगर, जळगाव) याला जळगाव शहरातून ताब्यात घेतले. दोघांकडून ६० हजार किमतीची एक किलो वीस ग्रॅमच्या चांदीच्या पट्टी स्वरूपात पाच लगड, ७२ हजारांची १४.४३० ग्रॅमचे सोन्याचे तीन लगड, ४० हजारांची गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, असा एकूण दोन लाख ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

टाक याच्यावर ३१ गुन्हे

संशयित किशोरसिंग टाक हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तब्बल ३१ घरफोडीसंबंधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलिस अधीक्षक बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनात आझादनगरचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश माळी, हवालदार योगेश शिरसाट, पोलिस नाईक योगेश शिंदे, संदीप कढरे, अविनाश लोखंडे, अझहर शेख, सचिन जगताप, नीलेश पाकड, पंकज जोंधळे, सिद्धार्थ मोरे, महिला कर्मचारी पवार व पारेराव यांच्या पथकाने केली.

police station team solved theft crime on basis of tattoo Dhule Crime News
Dhule Crime News : दोंडाईचा येथे मिरची व्यापाऱ्यावर हल्ला; एक संशयित ताब्यात

एक हिस्सा मुख्य संशयिताकडे

चोरीच्या मालातील दोन बडे हिस्से मुख्य संशयिताकडे असून, तो फरारी आहे. त्याने स्वर्ण पॅलेसमधील चोरीचे नियोजन केले होते. त्यासाठी तो तीन दिवस धुळ्यात मुक्कामी होता. त्याने रेकी करत ९ जुलैला सकाळी स्वर्ण पॅलेस या दुकानाची पाहणी केली. नंतर रात्री दोन साथीदारांना धुळ्यात बोलवले.

मध्यरात्रीनंतर एकला चोरीदरम्यान एक व्यक्ती आल्याने चोरी एक तास थांबविली होती. नंतर पुन्हा चोरी केली. गुन्ह्यातील सर्व माल घेऊन तिसरा व मुख्य संशयित फरारी असल्याची कबुली अटकेतील संशयिताने दिली. गुन्ह्यातील मालाचे एकूण चार हिस्से करण्यात आले होते.

police station team solved theft crime on basis of tattoo Dhule Crime News
Dhule Crime News : पेडकाईदेवी मंदिराच्या आवारात चोरीचा प्रयत्न; गुप्तधन काढण्याचा संशय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.