Dhule Crime News : पावणेचारशे टवाळखोरांवर कारवाई; पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडून दिलासा

Police officers and personnel participating in the inspection drive near a college in Deopur.
Police officers and personnel participating in the inspection drive near a college in Deopur.esakal
Updated on

Dhule Crime News : शहरासह जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात विनाकारण वावरणाऱ्या सुमारे पावणेचारशेवर टवाळखोरांविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी (ता. ५) धडक कारवाई केली.

जिल्हा पोलिस प्रशासनासह दामिनी पथकातर्फे सकाळी दहा ते दुपारी एकदरम्यान जिल्ह्यात १४ ठिकाणी हे विशेष अभियान राबविण्यात आले. (police took action against around 300 who were roaming around for no reason dhule crime news)

यादरम्यान शाळा व महाविद्यालयात विद्यार्थिनींचे समुपदेशनही करण्यात आले. या कारवाईमुळे शैक्षणिक संस्थांसह अभ्यासू विद्यार्थी, विद्यार्थिनींना दिलासा मिळाला. धुळे शहरासह जिल्ह्यात विविध महाविद्यालय, शाळा, कोचिंग क्लासेस, महिला वसतिगृहांच्या परिसरात अकारण वावरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्याची सूचना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

त्यानुसार शहर, परिसर आणि जिल्ह्यात मंगळवारी सकाळी दहापासून विशेष मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान महाविद्यालय, शाळा भागांमध्ये विनाकारण फिरणाऱ्या संशयितांवर कारवाई झाली. ओळखपत्र नसलेल्यांची झडती घेण्यात आली.

पोलिसांचे आवाहन

शैक्षणिक परिसरात आणि विशेषत: विद्यार्थिनींना पाहून अतिवेगाने वाहन चालविणारे, कर्कश आवाज करणारे दुचाकीस्वार, ट्रिपल सीट वाहन चालविणारे, सायलेन्सरचा मोठा आवाज असलेल्या बुलेटचालकांवरही कारवाई झाली. दामिनी पथक तसेच कारवाई पथकातील पोलिसांनी विद्यार्थिनींना समुपदेशन केले. काही तक्रार असल्यास निर्भीडपणे पोलिसांना माहिती कळविण्याचा सल्ला दिला.

Police officers and personnel participating in the inspection drive near a college in Deopur.
Dhule Crime News : एलसीबीने जुगार उधळला; 10 जण ताब्यात

३८९ जणांवर कारवाई

शहरातील बाफना स्कूल, साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालय, देवपूरमधील खासगी क्लासेस, एसएसव्हीपीएस महाविद्यालय, जयहिंद वरिष्ठ महाविद्यालय, देवपूर, चाळीसगाव रोडवरील नॅशनल ऊर्दू हायस्कूल, सना हायस्कूल, भावरी महाविद्यालय (ता. धुळे), सी. एस. बाफना हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श हायस्कूल, निजामपूर (ता. साक्री), गर्ल हायस्कूल, बीओडी कॉलेज, नूतन महाविद्यालय.

दोंडाईचा (ता. शिंदखेडा), एसएसव्हीपी महाविद्यालय, शिंदखेडा, एस. टी. गुजर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, बेटावद (ता. शिंदखेडा) आदी शैक्षणिक संस्थांच्या परिसरात आणि हमरस्त्यावर ही कारवाई झाली. शिरपूर शहरातील मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिंचे समुपदेशन करण्यात आले. जिल्ह्यात सुमारे ३८९ टवाळखोरांवर विविध कलमांन्वये कारवाई झाली.

Police officers and personnel participating in the inspection drive near a college in Deopur.
Dhule Crime News : वाडीजवळ अवैध मद्याचा ट्रक जप्त; संशयित फरारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.