Nandurbar News :केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत माजी सैनिक, विधवांचे पाल्य यांच्यासाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून, या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरणे सुरू असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. नीलेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. ( Pradhan Mantri Scholarship Scheme for Children of Widows nandurbar news)
माजी सैनिक विधवांचे पाल्य बारावी, डिप्लोमा व पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत व त्यांनी अभियांत्रिकी, बी.टेक., एमबीबीएस, बीडीएस, बीएड, बीबीए, बी. फार्मा, बीसीए, एमबीए आणि एमसीए इत्यादी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे,
अशा पाल्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाची यादी व अर्ज केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, संबंधितांनी त्यांच्या पाल्यांचे अर्ज ३० नोव्हेंबर २०२३ पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत.
योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे, दूरध्वनी ०२५६२-२३७२६४ येथे संपर्क साधावा, असेही कळविले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.