Nandurbar News : बऱ्याच वर्षांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित नंदुरबार तालुक्यातील प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला मंत्रालयीन स्तरावर व्ययअग्रक्रम समितीची रुपये ७९३.९५ कोटी किमतीची म्हणजे सुमारे ८०० कोटी रुपयांची प्रथम व सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली.
केलेल्या प्रयत्नांना आज प्रत्यक्षात यश लाभले असून, तापी बुराई जलसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांमधून मोठा आनंद व्यक्त केला जाऊ लागला आहे. (Prakash Burai Upsa Irrigation Scheme in Nandurbar taluka received administrative approval at ministerial level news)
गेल्या १९९९ पासून प्रलंबित असलेला प्रकाशा बुराई उपसा सिंचन प्रकल्प नंदुरबार शिंदखेडा व साक्री तालुक्यातील अनेक गावांना याचा फायदा होणार. तापी- बुराई जलसंघर्ष समितीने केलेल्या वारंवार आंदोलनामुळे लोकप्रतिनिधींनाही याची जाण झाली.
हिवाळी अधिवेशनामध्ये तापी-बुराई जलसंघर्ष समितीतर्फे शेतकरी बांधवांनी थेट नागपूरला जाऊन हिवाळी अधिवेशनात आंदोलन केले होते. या योजनेमुळे नंदुरबार तालुक्यातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील दुष्काळी भागाला तसेच शिंदखेडा व साक्रीमधील दुष्काळी भागाला या योजनेचा फायदा होणार आहे.
या योजनेमुळे नंदुरबार तालुक्यातील निंभेल, कंढरे, होळतर्फ, हाठमोहिदा, कोपर्ली, रनाळे, आसाने, खोकराळे, घोटाणे, न्याहाली, बलदाणे, भादवड, मांजरे, बह्याने, शनिमांडळ, तिलाली, तलवाडे, रजाळे, बलवंड, सैताणे, खर्दे-तलवाडे.
वैंदाणे, मालपूर, सुराय, खोकराळे या गावांना चार हजार हेक्टर सिंचन क्षेत्राला तसेच शिंदखेडा व साक्री तालुक्यातील तीन हजार १०० हेक्टर सिंचन क्षेत्राला फायदा होणार आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावून विहिरींच्या पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल.
सुमारे ८०० कोटी निधीची मान्यता प्राप्त झाली आहे. सर्व लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, पालकमंत्री अनिल पाटील, आमदार जयकुमार रावल, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, भाजपचे युवा नेते डॉ. विक्रांत मोरे, रवींद्र गिरासे, जलसंपदा विभाग नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर, उपकार्यकारी अभियंता कपिल सोनार आदी लोकप्रतिनिधींचे संघर्ष समितीतर्फे आभार व्यक्त केले आहेत. या संघर्षात संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक हिरालाल पाटील, रणवीर पाटील (सुराय), प्रफुल्ल पाटील (आसाने), योगेश पाटील (आसाने), भास्कर पाटील (शनिमांडळ) यांचा मोलाचा वाटा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.