Narendra Modi : प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांना मंजुरी; प्रधानमंत्री यांचा हस्ते ऑनलाइन उद्‍घाटन

narendra modi
narendra modiesakal
Updated on

Narendra Modi : नंदुरबार जिल्ह्यात प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र कार्यक्रमांतर्गत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजनेत ११ केंद्रांची निवड करण्यात आली असून, या केंद्रांचे गुरुवारी (ता. १९) गुरुवारी दुपारी चारला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्‍घाटन होणार असल्याचे कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांनी कळविले आहे. (Pramod Mahajan Rural Skill Development center Online Inauguration by Narendra Modi Nandurbar News)

ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी करण्यासाठी व स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगारासाठी ५०० प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली असून, याबाबत स्वारस्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. गठीत समितीमार्फत ५४ प्रशिक्षण संस्थांची

जिल्हानिहाय ५११ प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्रांची निवड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र उद्‍घाटन कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री, मंत्री कौशल्य रोजगार व उद्योजकता व नावीन्यत विभागाने केले आहे.

narendra modi
PM Narendra Modi: पंतप्रधानाच्या आगमनामुळे Navi Mumbaiमध्ये रस्ते ; पदपथ झाले चकाचक !

अशी असतील ११ केंद्रे

नंदुरबार जिल्ह्यात ११ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. ती अशी ः अक्राणी तालुका ः मांडवी बुद्रुक, तोरणमाळ व राजबर्डी. अक्कलकुवा तालुका ः मोरंबा, पिंपळखुंटा व मोलगी. शहादा तालुका ः म्हसावद व प्रकाशा. तळोदा तालुका ः बोरद. नवापूर तालुका ः खांडबारा. नंदुरबार तालुका ः रनाळे.

narendra modi
Narendra Modi: मोदींसमोर झाले नृत्याचे सादरीकरण अन् वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मिळाले स्थान !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()