Dhule News: भाजपने संधी दिल्यास लोकसभेची उमेदवारी : प्रतापराव दिघावकर

Prataprao Dighavkar
Prataprao Dighavkaresakal
Updated on

Dhule News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यशैली पाहून भाजपमध्ये प्रवेश केला. याद्वारे शेती समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल. सध्या निवडणूक लढविण्याचा विचार नाही.

मात्र, पक्षाने संधी दिल्यास लोकसभेची उमेदवारी करेल, असे नाशिक परिक्षेत्राचे निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी शनिवारी (ता. २) पत्रकार परिषदेत सांगितले. (Prataprao Dighavkar statement Lok Sabha candidature if given chance by BJP Dhule News)

श्री. दिघावकर म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देश वेगाने प्रगती करीत आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता भाजपत प्रवेश केला आहे. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू. धुळे लोकसभा मतदारसंघात सिंचनाची मोठी समस्या आहे.

शेतकऱ्यांचे भाग्य सिंचनामुळे पलटू शकते. पश्चिम वाहिनी नद्या, नदीजोड प्रकल्प, नार- पार प्रकल्प यातून जलऑडिट करायचे ठरविले आहे. नार-पार प्रकल्पाची १९५६ पासून चर्चा आहे.

या प्रकल्पातील पाणी धुळ्याला मिळाले तर शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल. खानदेशच्या हक्काच्या पाण्यासाठी योग्य व्यासपीठावर लढा दिला जाईल. रोजगारासह धुळे लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Prataprao Dighavkar
NMC News: गणेशमूर्ती विक्रीचे 151 स्टॉल्सचे लिलाव तहकूब

ग्रामीण भागातील समस्या जवळून पाहिल्या आहेत. विदेशात संधी मिळाली, तेव्हा शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आहेत. राज्य शासनाने अनेक पुरस्कारांनी माझा गौरव केला आहे. युवक, शेतकरी व महिला सक्षमीकरणावर कार्यात भर आहे.

बेरोजगारी दूर करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार आहे. बागलाण तालुक्यात वीस सिमेंट बंधारे बांधले आहेत. चाळीस सिमेंट बंधारे मंजूर केले आहेत. शेतमालाला भाव मिळावा ही आग्रही मागणी आहे.

सध्या पावसाअभावी राज्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भेटीअंती पॅकेजची मागणी करणार असल्याचेही श्री. दिघावकर म्हणाले.

Prataprao Dighavkar
Teachers Reruitment: स्वप्रमाणपत्रासाठी 15 पर्यंत मुदत; शिक्षक भरती प्रक्रियेंतर्गत उमेदवारांना सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.