Manoj Jarange Patil Dhule : मराठा आरक्षणाचा लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील यांची शहरात रविवारी (ता. ३) सभा आहे. त्यांचे स्वागत समितीतर्फे स्वागत केले जाईल. यात ५० जेसीबी आणि ड्रोनद्वारे त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाईल.
लक्षवेधी रांगोळी, पारंपारिक वाद्य, भगवे झेंडे, लेझीम पथकाद्वारे स्वागत होईल. याकामी सकल मराठा समाज स्वागत समितीच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे जरांगे-पाटील यांची भेट घेतली.(Preparation for program of Jarange Patil in dhule news)
शहरातील स्वागत सोहळ्यास जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी केले. त्यांच्यासह समितीने स्वागताच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसराची पाहणी केली.
श्री. जरांगे- पाटील तीन डिसेंबरला शहरात आल्यावर सकाळी साडेअकराला मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला अभिवादन होईल. सभेपूर्वी श्री. जरांगे-पाटील यांचे सकल मराठा समाजाच्या स्वागत समितीतर्फे स्वागत केले जाईल.
स्वागत सोहळ्यासाठी अमळनेर, पारोळा, साक्री, शिरपूर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, दोंडाईचा, चाळीसगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील सकल मराठा समाजबांधवांनी मनोहर टॉकीजजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ सकाळी साडेअकराला उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाज आणि स्वागत समितीचे मनोज मोरे, राजेंद्र इंगळे, नीलेश काटे, भरत काळे, हनुमंत आवताडे, अंबर मराठे, आबा कदम, अजय पाटील, हिमांशू भदाणे, मोहन टकले, वाल्मीक मराठे, राजेंद्र बोरसे, रवी कोरे, अनिल जगताप, दत्तात्रय माळोदे, रवींद्र शिंदे, किरण पवार, अमर फरतडे, वामन मोहिते, रुपेश भोकरे, भूषण वाघ, अक्षय पवार, अॅड. देठे, जयेश गायकवाड, जितेंद्र पाटील, अरविंद सुडके, सनी मोरे, प्रदीप पाटील आदींनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.