Dhule Marathon 2024 : धुळे शहरात शुक्रवारपासून टी-शर्ट, बीबचे होणार वाटप

पोलिस ग्राउंडवर रविवारी (ता. ४) पहाटे साडेपाचपासून होणाऱ्या धुळे मॅरेथॉन २०२४ स्पर्धेसाठी तयारीला वेग दिला गेला आहे.
Preparations for Dhule Marathon 2024 have been accelerated dhule news
Preparations for Dhule Marathon 2024 have been accelerated dhule newsesakal
Updated on

Dhule Marathon 2024 : येथील पोलिस ग्राउंडवर रविवारी (ता. ४) पहाटे साडेपाचपासून होणाऱ्या धुळे मॅरेथॉन २०२४ स्पर्धेसाठी तयारीला वेग दिला गेला आहे.

यात पोलिस ग्राउंडवर सशुल्क नोंदणीधारकास शुक्रवारी (ता. २) सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत टी-शर्ट आणि बीब, तसेच मोफत नोंदणीधारकास शनिवारी (ता. ३) सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत बीबचे (छातीवर लावण्याचा स्पर्धक क्रमांक) वाटप होणार आहे. (Preparations for Dhule Marathon 2024 have been accelerated dhule news)

यात १० व २१ किलोमीटर धावणाऱ्या स्पर्धकास शुक्रवारी टी-शर्टसह टायमिंग चीप असलेल्या बीबचे वाटप केले जाईल. धुळेकरांसह स्पर्धकांनी आयोजकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेचे सीईओ शुभम गुप्ता आणि महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी केले.

जिल्हा पोलिस दलाच्या पुढाकारासह महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर एसव्हीकेएम संस्था, रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड, माध्यम प्रायोजक ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या साथीने ही स्पर्धा होत आहे.

Preparations for Dhule Marathon 2024 have been accelerated dhule news
Dhule Marathon News : धुळे मॅरेथॉन तयारी; विजेत्यांना 2 लाखांची बक्षिसे

‘बीब’ घेणे आवश्‍यक

स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी www.dhulemarathon.in या वेबसाइटशी संपर्क साधावा. सशुल्क नोंदणीधारक स्पर्धकास टी-शर्ट, टायमिंग बीब, मेडल, एनर्जी ड्रिंक, पाणी, नाश्‍ता व ई-सर्टिफिकेटचा लाभ दिला जाईल. मोफत नोंदणी केलेल्या स्पर्धकास टी-शर्ट दिला जाणार नाही.

मात्र, त्यास बीब, मेडल, एनर्जी ड्रिंक, पाणी, नाश्‍ता व ई-सर्टिफिकेटचा लाभ दिला जाणार आहे. सशुल्क आणि मोफत नोंदणीधारक स्पर्धकाने शुक्रवारी (ता. २) व शनिवारी (ता. ३) छातीवर लावण्याचा स्पर्धक क्रमांक म्हणजेच ‘बीब’ घेतल्यानंतरच त्यांना निर्धारित लाभ मिळू शकतील.

यंदा फिट धुळे हिट धुळे हेच स्पर्धेचे घोषवाक्य असून, रन फॉर पांझरा या थीमवर स्पर्धक धावतील. स्पर्धेसाठी एकूण साडेतीन लाख रुपयांहून अधिक बक्षिसे दिली जातील. पोलिस मैदानावर रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असेल. धुळेकरांसह स्पर्धकांचा रविवार संस्मरणीय व्हावा यासाठी आयोजक कठोर परिश्रम घेत आहेत.

Preparations for Dhule Marathon 2024 have been accelerated dhule news
Dhule Marathon 2024 : ‘रन फॉर पांझरा’च्या माध्यमातून जनजागृती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.