Dhule News: खानदेशातील तेरा कुळांची कुलदैवत जोगाईमाता, राज्यातील वाणी समाजाची कुलस्वामिनी अन्नपूर्णामाता व खलाणे कुळाची कुलदेवता पाचपावली माता या तिन्ही देवींच्या आश्विन नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
१५ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती जोगाईमाता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अरुण पाटील यांनी दिली.(Preparations for Navratri Festival of Pachapavali with Jogaimata Annapurnadevi in Kapdane speeding up dhule news)
जोगाईमाता
भात नदीच्या काठावर जोगाईमातेचे दाक्षिणात्य पद्धतीचे ६१ फूट उंचीचे भव्य मंदिर आहे. देवीची प्रतिष्ठापना १२३२ मध्ये आंबेजोगाई येथून आबाजी व दादाजी पाटील यांनी आणली होती. भामरे, जाधव, काळे, शेटे, ठाकूर, कापडणीस, देशमुख, शिंपी, सोनार आदी तेरा कुळांची कुलदेवता आहे. खानदेशासह गुजरातमधून भाविक नवस फेडण्यासाठी येतात.
राज्यात दोनच अन्नपूर्णामाता मंदिरे
राज्यात अकोला आणि दुसरे कापडणेत अशा दोनच ठिकाणी अन्नपूर्णा मंदिर आहे. चैत्र नवरात्रोत्सवात वाणी समाज दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येत असतात. मंदिराचे विश्वस्त आहेर म्हणून आलेल्या किमती वस्तू गरीब महिलांना दान करीत असतात.
खलाणे कुळाची कुलदैवत पाचपावली
खानदेशासह राज्यातील खलाणे कुळाची कुलदैवत पाचपावली माता आहे. येथील नवरात्रोत्सवही मोठ्या धामधुमीत होत असतो. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.
कीर्तनी महोत्सव
ग्रामदेवता भवानीमाता मंदिरात सलग २२ वर्षांपासून नवरात्रोत्सवात महिला कीर्तनी सप्ताह सुरू आहे. या वर्षीही नियोजन असल्याचे भवानी भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात कुलदेवतांची मंदिरे फुलणार
जिल्ह्यात एकवीरा माता (धुळे), धनदाई माता (म्हसदी), पेडकाईमाता (सावळदे), जोगाई माता (कापडणे), धनाई पुनाई माता (निजामपूरजवळ), बिजासनी माता (शिरपूर ते सेंधवादरम्यान), जोगेश्वरी माता (जोगशेलू), योगेश्वरी माता, संतोषीमाता (धुळे), पाचपावली माता (कापडणे), भवानी माता (कुसुंबा), आशापुरी माता (पाटण), अन्नपूर्णामाता (कापडणे), भटाईमाता (भदाणे), म्हाळसामाता (अर्थे), इंदाशीमाता (कुंडाणे), सती माता (बोरीस) आदी कुलदेवतांची मंदिरे आहेत. या मंदिरांत नवरात्रोत्सवाचे जोरदार नियोजन सुरू आहे. लवकरच भाविकांचा मळा फुलणार आहे.
नवरात्रोत्सवातील रंग
१५ ऑक्टोबर/पहिली माळ-केशरी
१६ ऑक्टोबर/दुसरी माळ-पांढरा
१७ ऑक्टोबर/तिसरी माळ-लाल
१८ ऑक्टोबर/चौथी माळ-रॉयल ब्लू
१९ ऑक्टोबर/पाचवी माळ-पिवळा
२०ऑक्टोबर/सहावी माळ-हिरवा
२१ ऑक्टोबर/सातवी माळ-राखाडी
२२ऑक्टोबर/आठवी माळ-जांभळा
२३ऑक्टोबर/नववी माळ-मोरपंखी हिरवा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.