धुळे : शहरातील चर्चमध्ये आकर्षक रोषणाई, पेस्ट्रीज, केकने सजलेल्या बेकऱ्या, ख्रिसमस ट्री- आकाशकंदिलने सजलेला परिसर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, असे जल्लोषपूर्ण वातावरण शुक्रवारी (ता. २३) नाताळच्या तयारीनिमित्त पाहायला मिळाले. ‘जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल द वे’ असे म्हणत रविवारी (ता. २५) प्रभू येशूच्या जन्माचे स्वागत होईल.
नाताळच्या सेलिब्रेशनचा उत्साह शहरातील राजवाडे संशोधन मंडळासमोरील सेंट अॅन्स कॅथॉलिक चर्च, वाडीभोकर रोडवरील देवपूर चर्च, साक्री रोडवरील मोगलाई चर्च या प्रमुख देवालयांमध्ये दिसत आहे. ख्रिस्ती भाविकांसह तरुणाईनेही नाताळची हटके तयारी केली आहे.(Preparations speed up in church with Christmas in the Dhule Dhule News)
शहरात रविवारी साजरा होणाऱ्या ख्रिस्तजन्मोत्सवाची तयारी पूर्ण होत आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर या सेलिब्रेशनला उधाण येणार आहे. येशूजन्माचा आनंद साजरा करण्यासाठी सर्वच चर्चमध्ये रंगरंगोटी झाली आहे.
विशेष प्रार्थना आणि पारंपरिक कार्यक्रमांचेही आयोजन आहे. रविवारी सकाळी साडेआठनंतर शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना (मिसा) होणार आहे. यानिमित्त चर्च आवारात येशूजन्माचा देखावा साकारण्यात येत आहे. चौकाचौकांत सांताक्लॉजच्या लाल टोप्या विकणारे लक्ष वेधून घेत आहेत. शुभेच्छापत्रे, भेटवस्तू, आकर्षक पॅकिंगमध्ये चॉकलेट आणि रंगीबेरंगी मेणबत्त्यांनी दुकाने सजली आहेत. मॉलमध्ये सांताक्लॉज मुलांना भेटवस्तू आणि चॉकलेट देत आहेत.
"प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव सोहळा ख्रिसमस आनंदपर्व आहे. येशूजन्माचे स्वागत मोठ्या उत्साहात होते. नाताळनिमित्त चर्च व परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, चर्चच्या आवारात गोठा व येशूजन्माचा देखावा साकारण्यात आला आहे. चर्चमध्ये पारंपरिक प्रार्थना होणार आहे."
- फादर विल्सन रॉडीग्ज ,धर्मगुरू, कॅथॉलिक चर्च, धुळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.