Dhule News : मृग नक्षत्र सुरु होऊन तीन दिवस उलटले आहेत. पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
नैऋत्य मोसमी वारे आणि पाऊस केरळमध्ये दाखल झाला आहे. खानदेशातही पावसासाठी पूरक वातावरण तयार होत आहे.
शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित होऊ लागल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी मक्याची धूळ पेरणी सुरु केली आहे.
बागायतदार शेतकऱ्यांनी कापसाच्या लागवडीस वेग दिला आहे. यंदा कापसा एवढेच मक्याचे क्षेत्र राहील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (price of cotton falls area of maize will increase Shetshivar Cotton are expected to decline by 15 percent wait for monsoon Dhule News)
वाढते मक्याचे क्षेत्र
धुळे जिल्ह्यात मक्याला वाढती मागणी आहे. मक्यापासून विविध पन्नासपेक्षा अधिक उत्पादने निर्मित होत आहे. पशूपक्ष्यांसाठी खाद्यान्न आहारही अधिक तयार होत आहे. परिणामी मक्याचे भाव परवडणारे आहे. मका म्हणजे कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक झाले आहे. परिणामी मक्याचे क्षेत्र वाढतेच राहणार असल्याचे शेतकरी सांगतात.
कापसाचे क्षेत्र घटणार
शेतकऱ्यांना गेल्या वर्षी कापसाच्या भावाने धोका दिला. कापसाचा बाजारभाव पडताच राहिला. शासनानेही लक्ष दिले नाही. जागतिक बाजारपेठेतही कापसाने उचल घेतली नाही. एकंदरीत कापसाचे क्षेत्र घटण्यावर होणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
"सरकारने कापसाच्या भावाकडे लक्ष दिले नाही. नऊ हजार दोनशेवरून थेट सहा हजारावर कापसाचे भाव पडले. कापसाचे मोठे उत्पादन येऊन हाती नफा लागला नाही.
बहुतांश मोठ्या शेतकऱ्यांनी कापूस अद्यापही भरून ठेवला आहे. पडलेले भाव आणि भरून ठेवलेला कापूस याचा परिणाम कापसाच्या क्षेत्रावर होणार आहे. यंदा दहा ते पंधरा टक्क्याने क्षेत्र घटेल."
-आत्माराम पाटील, माजी जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना धुळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.