Nandurbar News : जेल मधून पलायन करणारे निघाले चंदन चोर; नंदुरबार पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई

Nandurbar Crime news
Nandurbar Crime newsesakal
Updated on

नंदुरबार : नवापूर येथे दरोड्याचा प्रयत्नात असलेले पाचही जणांना अटकेनंतर त्यांनी काही तासातच जेलची खिडकी तोडून पलायन केले होते. त्यानंतर पाचही जणांना पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले आहे. चौकशीत नवापूर येथून चक्क चंदनाचे झाड तोडून लाकूड चोरून नेत असल्याचे उघड झाले. त्यावरून पोलिसांनी पुढील तपासात मध्य प्रदेशात विकलेले १५ लाख ७२ हजाराचे लाकूडसह तेलही हस्तगत केले.

५ डिसेंबर २०२२ ला पाच जणांनी नवापूर पोलिस ठाण्याचे लॉकअपची मागील खिडकी तोडून पलायन केले होते. स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलिसांच्या पथकाने फरार झालेले सर्व पाच आरोपीतांना मध्य प्रदेश व औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून ताब्यात घेतले आहे.

Nandurbar Crime news
Nandurbar Police News : कुडकुडणाऱ्या निराधारांना खाकीची ऊब

त्यात गौसखॉ हानिफखॉ पठाण हा सराईत असल्याने त्यास अधिक विचारपूस केली असता त्याने सप्टेंबर-२०२२ मध्ये नवापूर येथे त्याच्या साथीदारांच्या मदतीने चंदनाचे झाड कापून तसेच महाराष्ट्र व इतर राज्यात चंदनाचे झाड कापून ते इतर साथीदारांचे मदतीने अब्दुल रेहमान कादर (रा. गवाडी ता.जि. सेंधवा मध्यप्रदेश) यांना विक्री केल्याचे सांगितले. नवापूर येथील चंदन चोरीबाबत गुन्हा दाखल असून २० हजार रुपये किमतीचे चंदनाचे हिरवे झाड कोणी तरी चोरून नेल्याची नोंद आहे.

पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नवापूर पोलिस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे शाखेचे तत्काळ पथक तयार करून मध्य प्रदेशमध्ये बडवानी जिल्ह्यात रवाना केले. सेंधवा गवाडी गावात जाऊन अब्दुल रेहमान कादर याची माहिती घेतली असता अब्दुल कादर याची एस.बी. अरोमॅट्रीक्स नावाची फॅक्टरी असल्याचे समजले.

Nandurbar Crime news
Nandurbar News : सुसाट वाहनांमुळे निष्पाप नागरिकांचा बळी; शून्य उपाययोजनांमुळे अपघातांत वाढ

पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने अब्दुल रेहमान कादर याच्या मालकीचे एस.बी. अरोमॅट्रीक्स फॅक्टरीमध्ये गेले असता तेथे तीन जण उपस्थित होते. त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता अब्दुल रहेमान अब्दुल कादर (वय ५८, मूळ राहणार कुन्नीकलम हाऊस, आलंम्मपाडे ता. मुथवडे जि. कासारगड, केरळ ह.मु. एस.बी. अरोमॅक्ट्रीक्स फॅक्टरी, गवाडी ता. निवाणी जि. बडवानी), सौदागर सहदेव कोलते (वय ४६ ) व उमेश विलास सूर्यवंशी (वय-४० दोन्ही रा. नारी ता. बार्शी जि. सोलापूर) असे सांगितले.

अब्दुल रहेमान कादर यास गौसखाँ पठाण याची ओळख देवून त्याने दिलेल्या चंदनाच्या झाडाचे लाकुडबाबत विचारपूस केली. पथकाने संपूर्ण फॅक्टरीची पाहणी केली असता टाटा कंपनीच्या (YODHA) गाडीमध्ये खालच्या बाजूने दोन तीन फुटाचे लांब खाच व त्यामध्ये ५ लाख ८४ हजार रुपये किंमतीचे २९२ किलो चंदनाचे लाकडाचे तुकडे मिळून आले. पथकाने फॅक्टरीची बारकाईने पाहणी केली असता तेथे १७ लाख ७२ हजार रुपये किमतीचे २६.०२ किलो ग्रॅम वजनाचे चंदनाचे सुगंधी तेल व चंदनाचे लाकूड वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे ७ लाखाची टाटा कंपनीचे वाहन (क्र MH-४६ BF-०५४३ ) असा एकूण २८ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करून तिघांना ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.