Nandurbar News : तळोद्यात स्वच्छतागृहांचा प्रश्न ऐरणीवर

Taloda: MNS taluka chief Vipul Rane, city chief Sudhakar Mali and businessmen while giving a statement to Principal Sapna Vasava
Taloda: MNS taluka chief Vipul Rane, city chief Sudhakar Mali and businessmen while giving a statement to Principal Sapna Vasavaesakal
Updated on

तळोदा : शहरात अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांचा अभाव असून, लघुशंकेसाठी नागरिकांना अडचणी येत असतात. त्यामुळे पालिकेने निदान गजबजलेल्या कॉलेज रोडकडे तरी स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत मनसेचे तालुकाप्रमुख विपुल राणे यांनी व्यावसायिकांसह पालिकेचा मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन स्वच्छतागृहाचा प्रश्न उपस्थित केला आहे.

तळोदा शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिवाय तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात कार्यालयीन कामकाजासाठी नागरिक येत असतात; परंतु शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्वच्छतागृहाचा मोठा अभाव आहे. (problem of toilets is continue in taloda manse request about solves problem to municipal corporation nandurbar nandurbar news)

Taloda: MNS taluka chief Vipul Rane, city chief Sudhakar Mali and businessmen while giving a statement to Principal Sapna Vasava
Nandurbar News : खापरला प्रभाग तीन अ मधील जागेसाठी फेरनिवडणूक

त्यातही कॉलेज रोड, तहसील रोड या प्रमुख ठिकाणी एकही स्वच्छतागृह नाही. साहजिकच नागरिकांना लघुशंकेसाठी मोठ्या अडचणी येत असतात. काही नागरिक आडोशाचा आधार घेत असतात. हे चित्र अतिशय विदारक आहे.

या परिसरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांची प्रतिष्ठाने आहेत. त्यांनादेखील अडचणी येतात. वास्तविक या परिसरात एखादे स्वच्छतागृह पालिकेने उभारण्याची नितांत गरज असताना त्याकडे प्रशासन साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. एकीकडे स्वच्छतेवर केंद्र व राज्य शासनाचा प्रचंड जोर असताना मात्र शहरातील नागरिकांना पुरेशा स्वच्छतागृहांबाबत झगडावे लागत आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Taloda: MNS taluka chief Vipul Rane, city chief Sudhakar Mali and businessmen while giving a statement to Principal Sapna Vasava
Gram Panchayat Election : नंदुरबारमध्ये चुरशीची लढत; राजकीय दावे- प्रतिदावे अन् सत्तेचे वर्चस्व

त्यामुळे शहरातील स्वच्छतागृहांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे, अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर मनसेचे तालुकाप्रमुख विपुल राणे, शहरप्रमुख सुधाकर माळी, भूषण कलाल, कैलास चव्हाण, मेहुल भरवाड, नचिकेत पिंपरे, जगदीश बछाव, अनिल हिंदुजा, मुन्ना पटेल, दीपेश परदेशी, वासुदेव शिंपी, मनोज बिरारे, बशीर शिकलीकर, विजय परदेशी, दीपक मराठे, भगवान हिवरे, पूनमचंद सजनकार, हिरालाल महाले, नीतेश महाले, लक्ष्मण महाले, अफताब पिंजारी, मणिलाल बच्छाव, उमाकांत परदेशी, राजेंद्र महाले, चंद्रशेखर भामरे, भगवान ठाकरे यांनी केली आहे.

घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लावा

शहरातील स्वच्छतेचा ठेका संपुष्टात आल्याने शहरातील साफसफाई नियमित होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले असून, स्वच्छतेअभावी अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्याचबरोबर घरोघरी घनकचरा संकलनासाठी येणाऱ्या घंटागाड्यादेखील नियमित येत नसल्याचे नागरिक सांगतात. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. निदान शहराच्या घनकचऱ्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने ठेकेदाराचा ठेका तातडीने काढावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

Taloda: MNS taluka chief Vipul Rane, city chief Sudhakar Mali and businessmen while giving a statement to Principal Sapna Vasava
Rajya Natya Spardha: अखेरच्या दिवशी ‘रिबाऊंड’ आणि ‘फायनल ड्राफ्ट’चे सादरीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()