Dhule News : उत्पादन घटल्याने गरिबांची भाकर महागली; ज्वारी अडीच ते 5 हजार रुपये क्विंटल

sorghum bhakri
sorghum bhakri esakal
Updated on

Dhule News : मागील अनेक वर्षापासून गरिबांचा आहार मानली जाणारी ज्वारी उत्पादन घटल्याने महागली आहे. वाढत्या महागाईमुळे ज्वारीची भाकर गरिबांच्या ताटातून गायब होऊ लागली आहे.

यंदा ज्वारीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षी पावसाची अनियमितता असल्याने उतारा कमी बसल्याने उत्पादन घटले आहे.(production of sorghum has decreased to large extent dhule news)

स्थानिक बाजार समितीत सर्वसाधारण ज्वारीला २ हजार ८००, हायब्रीड ३ हजार, तर दादर प्रजातीच्या ज्वारीला ५ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. जिल्ह्यात सर्वत्र ज्वारीचे उत्पादन कमी झाले आहे. काही वर्षांपूवी ज्वारी हे गरिबांचे धान्य समजले जात असे. गहू केवळ सणासुदीला ताटामध्ये दिसत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.

एकीकडे ज्वारीची भाकर पचनास हलकी असल्याने व आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरणारी आता श्रीमंतीचे प्रतीक झाली आहे. गव्हापेक्षाही ज्वारीचे भाव वाढले आहेत तर दुसरीकडे गरिबांच्या ताटात भाकरी ऐवजी चपाती दिसू लागली आहे.

जिल्ह्यात वर्षानुवर्षे ज्वारीचे पीक घेणारे शेतकरी आता नावालाच ज्वारीची पेरणी करतात. त्यांचा कल आता नगदी पिकाकडे दिसत आहे. ज्वारी महागल्याने गरिबांना महागाईचे चटके जाणवू लागले आहेत. एकेकाळी १ हजार ५०० ते दोन हजार रुपयांमध्ये मिळणारी ज्वारी आता तीन ते पाच हजार रुपये क्विंटलवर पोचली आहे. त्यामुळेच गरिबांच्या ताटातून आता ज्वारीची भाकर गायबच झालेली दिसत आहे.

आवक घटली

गेल्या आठवडाभरात बाजार समितीत तिन्ही प्रतींच्या ज्वारीची आवक घटली आहे. ५ डिसेंबरला बाजार समितीत सर्वसाधारण ज्वारीची केवळ दोन क्विंटल आवक झाली. त्यामुळे भाव किमान दोन हजार ६११ व कमाल दोन हजार ८०० होता. दादर प्रजातीच्या ज्वारीची एक क्विंटल आवक झाल्याने भाव पाच हजार ३०० रुपये होता. सर्वाधिक आवक मक्याची ६३० क्विंटल झाली. त्याचा दर एक हजार ८३१ ते दोन हजार २३१ रुपये क्विंटल होता.

sorghum bhakri
Dhule News : शिंदखेडा मतदारसंघाला 70 कोटींचा निधी मंजूर : आमदार जयकुमार रावल

धुळ्याच्या बाजार समितीत बाजरी दोन हजार २०० ते दोन हजार ४२५ तर गव्हाला दोन हजार ६१७ ते दोन हजार ८७८ रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. हायब्रीड ज्वारीची आवक तुलनेने समाधानकारक असल्याने शेतकऱ्‍यांना दोन हजार ७०० ते तीन हजार १०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. सद्यःस्थितीत किरकोळ बाजारात दादर प्रजातीची चांगल्या प्रतीची ज्वारी ५५ ते ६० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.

वैरणीचाही तुटवडा

सध्या ज्वारीला चांगला दर मिळत असला तरी, नगदी पीक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्‍यांचा कल वाढत आहे. पारंपरिक पद्धतीने पेरली जाणारी ज्वारी आता केवळ पीक व जनावरांना वैरण राहावे, या उद्देशाने पेरली जात आहे. वैरणीचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. वैरणीचे दरही गगनाला भिडले आहेत. मात्र, दुसरीकडे स्थूलपणा कमी करण्यासाठी ज्वारी व बाजरीला मागणी वाढली आहे.

sorghum bhakri
Dhule News : साक्री मतदारसंघासाठी 258 कोटींचा निधी मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.