Shiv Jayanti 2023 | शिवराय सार्वकालिक सर्वोत्तम सेनानायक : प्रा. नितीन बानुगडे- पाटील

शिरपूरला शिवजन्मोत्सव उत्सव समितीतर्फे व्याख्यान
nitin bangude patil
nitin bangude patilesakal
Updated on

शिरपूर (जि. धुळे) : एकाच वेळी स्वकीय आणि परकीय शत्रूंशी सामना, दऱ्याखोऱ्यांत गनिमी कावा आणि समुद्रात आरमाराचा प्रभावी वापर, आक्रमण आणि माघारीची अचूक वेळ, युद्धादरम्यान अफवा तंत्राचा यशस्वी उपयोग, नवनवीन युद्धतंत्रे आणि शस्त्रास्त्रांचा वापर अशी सर्व वैशिष्ट्ये एकवटलेले छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या इतिहासातील सार्वकालिक सर्वोत्तम सेनानायक ठरतात, असे प्रतिपादन शिवव्याख्याने प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले. (Prof Nitin Banugade Patil statement at Shiv Jayanti 2023 at dhule news)

येथील शिवजन्मोत्सव उत्सव समितीतर्फे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शनिवारी (ता. १८) सायंकाळी पित्रेश्वर कॉलनीच्या मैदानावर झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज महाजन, शिवसेनेचे भरतसिंह राजपूत, उत्सव समितीचे पदाधिकारी व विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, की पर्वतरांगांनी संरक्षण केलेल्या महाराष्ट्राला खरा धोका समुद्री सीमेकडून संभवतो हे साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी ओळखले होते. त्यासाठी त्यांनी आरमार उभारले.

नव्या तंत्रांचा समावेश करून सक्षम जहाजबांधणी केली. राज्याभिषेकप्रसंगी त्यांनी कानूनजाब्ता ही राज्यघटना तयार करून त्यात अष्टप्रधान मंडळ, त्यांच्या अखत्यारीतील खाती, त्यातील कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आणि संख्या अशी तजवीज केली.

अनुकंपा तत्त्वावर नोकरी, निवृत्तिवेतन, विधवांना पेन्शन, दुर्बल घटकांना सरकारी मदत, प्रमाणिक नकाशे तयार करणे, महसुलाची न्याय पद्धत, शेतकऱ्यांना आपत्तीप्रसंगी मदत अशी भरीव कामगिरी महाराजांनी केली.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

nitin bangude patil
Shresthadan Mahaabhiyan | आता 65 वर्षावरील व्यक्तीही करणार अवयवदान : मंत्री डॉ. भारती पवार

अल्पश: आयुष्यात त्यांनी बजावलेल्या कर्तव्याची बरोबरी कोणालाही शक्य झाली नाही. नियोजन, संधी ओळखणे, कार्य उरकण्याची तडफ, विश्वासू माणसांचा गोतावळा निर्माण करणे, प्रत्येकाला न्याय आणि वाव मिळले असे स्वराज्य स्थापन करून त्यातील प्रत्येक घटकात स्वराज्याविषयी आपुलकी तयार करणे अशा गुणवैशिष्ट्यांद्वारे त्यांनी जागतिक मान्यता मिळविली.

शिवचरित्र वाचून त्यातील शिवरायांचे गुण घ्यावेत म्हणजे आयुष्यात कधीही अपयशाचे तोंड पाहावे लागणार नाही.

माजी नगरसेवक हेमंत पाटील यांनी प्रास्तविकातून मंडळाच्या कार्याचा आढावा सादर केला. ललिता पाटील, प्रवीण शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णकला नृत्य अकादमीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक शिवनृत्ये सादर केली. शिवजन्मोत्सव समिती, पाटीलवाडा मित्रमंडळ, नवदुर्गा लष्करी प्रशिक्षण संस्थेसह विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले.

nitin bangude patil
HSC Exam : बारावीची उद्यापासून परीक्षा; परीक्षेविषयी हे माहिती असू द्या...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.