Agriculture University : कृषी विद्यापीठ निर्मितीत खोडा घालण्याचा प्रयत्न; प्रा. शरद पाटील

Prof Sharad Patil statement about Attempts to sabotage the creation of an agricultural university dhule news
Prof Sharad Patil statement about Attempts to sabotage the creation of an agricultural university dhule newsesakal
Updated on

धुळे : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभाजनानंतर निर्माण होणाऱ्या नियोजित कृषी विद्यापीठासाठी सुचविलेली व संध्या बंद असलेल्या संजय सहकारी

साखर कारखान्याच्या २०० एकर जागेवर विस्तारित एमआयडीसी (Midc) आणण्याच्या अट्टाहास सुरू आहे. (Prof Sharad Patil statement about Attempts to sabotage the creation of an agricultural university dhule news)

याला कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीने विरोध दर्शविला आहे. याबाबत राज्याचे उद्योगमंत्री तसेच संजय कारखान्याचे विद्यमान अवसायक तथा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे हरकत नोंदविणार असल्याचे समितीचे निमंत्रक प्रा. शरद पाटील यांनी म्हटले अहे.

नियोजित कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी २००९ पासून धुळे जिल्हावासीयांचा लढा सुरू आहे. त्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती काम करत आहे. यापूर्वी राज्य सरकारने नेमलेल्या डॉ. एस. वाय. पी. थोरात व डॉ. वेंकटेश्वरलू समितीनेही नियोजित विद्यापीठ धुळ्यात व्हावे, असे अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे नियोजित विद्यापीठ इतरत्र पळविण्याचा प्रयत्न केल्यास त्यास जनआंदोलन व न्यायालयीन लढाईद्वारे तीव्र विरोध करण्याची तयारी असल्याचे प्रा. पाटील यांनी म्हटले आहे.

माजी मंत्री, आमदारांचा खोडा

विद्यापीठ निर्माण कृती समितीतर्फे नियोजित विद्यापीठासाठी सुचविण्यात आलेल्या जागांमध्ये अवसायनात निघालेल्या संजय सहकारी कारखान्याची शासनाकडे जमा २०० एकर जमिनीचाही समावेश आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

Prof Sharad Patil statement about Attempts to sabotage the creation of an agricultural university dhule news
Onion Subsidy : कांदा अनुदानावरून शेतकरी भडकले! तुटपुंजी मदत करत जखमेवर चोळलयं मीठ

असे असताना धुळे शहराचे आमदार फारूख शाह व नवलनगरचे रहिवासी तथा माजी केंद्रीय दळणवळणमंत्री विजय नवल पाटील यांनी ही जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला सुपूर्द करून नवलनगरला औद्योगिक क्षेत्र म्हणून संपादन करण्यासाठी शासनाला पत्र दिले आहे. यातून नियोजित विद्यापीठाच्या निर्मितीत खोडा घालण्याचा प्रकार असल्याचे वाटते, असे समितीचे निमंत्रक प्रा. पाटील यांनी म्हटले आहे.

...अन्यथा विरोध

दरम्यान, विद्यापीठाशिवाय इतर कामास जागा दिल्यास साखर कारखान्याचे मृत व जिवंत धुळे, शिदखेडा व अमळनेर तालुक्‍यातील सभासद व त्यांच्या वारसांकडून सह्यांची मोहीम राबवून याकामी विरोध केला जाईल, असे कारखान्याचे भागधारक सभासद प्रा. शरद पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

सहकार्याचे आवाहन

संजय कारखान्याची जागा एमआयडीसीला दिल्यास हेक्‍टरी अत्यल्प मोबदला मिळेल. त्यातून जिल्हा बँक व कारखान्याकडे प्रलंबित देणेसुद्धा पूर्ण होणार नाही. शिवाय नवलनगर परिसरात एमआयडीसीला सोयी-सुविधा पुरविणे शक्‍य होणार नाही. उलटपक्षी कृषी विद्यापीठासाठी जागा दिल्यास जास्तीचा मोबदला मिळू शकतो.

त्यामुळे माजी मंत्री पाटील, आमदार शाह व अवसायक यांनी विद्यापीठ निर्मितीच्या प्रयत्नात खोडा घालू नये, जिल्हा बँकेनेही खोडा घालण्याच्या प्रस्तावामागे न लागता कृषी विद्यापीठ निर्मितीच्या कामाला सहकार्य करावे, असे आवाहनही प्रा. पाटील यांनी केले आहे

Prof Sharad Patil statement about Attempts to sabotage the creation of an agricultural university dhule news
Abhay Yojana : दोन मोबाईल टॉवर, एक गाळा सील; मालमत्ता कर थकबाकी न भरल्याने कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.