Nandurbar News : जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश जारी; कायदेशीर कारवाई होणार

 police
policeesakal
Updated on

Nandurbar News : जिल्ह्यात १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जारी केले आहेत.

या आदेशात सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठ्या किंवा शारीरिक दुखापत करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेऊन फिरता येणार नाही. (Prohibitory orders issued by District Collector in nandurbar news )

अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरता येणार नाही. दगड अगर अस्त्रे, सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारे, साधने इत्यादी तयार करणे, जमा करणे किंवा बरोबर नेणे यावरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत.

सार्वजनिक शांतता धोक्यात येईल असे भाषण करणे, हावभाव करणे अथवा सोंग आणणे असे प्रकार करता येणार नाहीत. याचबरोबर जाहीरपणे घोषण देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे तसेच कोणत्याही व्यक्तीची आकृती किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे अगर दहन करणे या आदेशाचे उल्लंघन समजले जाईल.

या मनाई हुकमान्वये पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किंवा त्यांनी अधिकार प्रधान केलेले इतर अधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असलेला जमाव जमण्यास किंवा मिरवणुकीस या आदेशात मनाई आहे. ही परवानगी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बघून देण्यात येईल.

तसेच ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत धडगाव येथे श्री अश्वत्थामा ऋषींची अस्तंबा यात्रा भरते. वसूबारशीपासून भाविक सातपुड्यातील अस्तंबा शिखर चढण्यास सुरवात करतात व लक्ष्मीपूजनाचे दिवसापर्यंत घरी परत येतात. यात्रेस मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात.

 police
Nandurbar News : आदिवासी भागात बारमाही उत्पन्नाच्या स्रोताची आस; ठोस पावले उचलण्याची आवश्यकता

तळोदा पोलिस ठाणे हद्दीत मोरवड (रंजनपूर) येथे दिवाळीच्या दिवशी संत गुलाम महाराज व संत रामदास यांच्या समाधीस्थळी आरती, पूजन कार्यक्रम (आदिवासी मेळावा) कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमासही महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व गुजरातमधील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात.

सध्याचे राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण बघता जिल्ह्यात विविध संघटनांतर्फे धरणे, मोर्चे, बंद इत्यादी आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैयक्तिक व सामूहिकरीत्या बेमुदत/लाक्षणिक उपोषणे करण्यात येतात. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यानी मनाई हुकूम जारी केला आहे.

''जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. नागरिकांनी या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना जमण्यास मनाई आहे, असा जमाव जमल्यास त्यांच्यावर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.''-पी. आर. पाटील, पोलिस अधीक्षक, नंदुरबार

 police
Nandurbar News : हातोडा तापी पाणीपुरवठा योजना; तळोद्यात पाइपलाइन टाकण्याच्या कामाला वेग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.