Nandurbar News : ...अन्‌ त्यांच्या पोटाला मिळाली भाकरी

Taloda: Workers distributing cheap grain to migrant laborers in the presence of Tehsildar Girish Wakhare. Neighbor Supply Inspector Pramod Doifode, Anil Pardeshi
Taloda: Workers distributing cheap grain to migrant laborers in the presence of Tehsildar Girish Wakhare. Neighbor Supply Inspector Pramod Doifode, Anil Pardeshiesakal
Updated on

तळोदा : पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख प्रशासन ही प्रत्येक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची नैतिक जबाबदारी असते. तसेच प्रशासकीय सेवेत असताना अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना तत्पर सेवा देणे अपेक्षित आहे.

याच तत्परतेचा व सतर्कतेचा अनुभव येथील श्रीकृष्ण खांडसरीतील स्थलांतरित मजुरांना आला. जिल्हाधिकारी मनीषा खत्री व तहसीलदार गिरीश वखारे यांच्या तत्परता व सतर्कतेमुळे या मजुरांना त्यांच्या हक्काचे रेशनचे धान्य मिळाले आहे. त्यामुळे मजुरांना सुखद अनुभव आला असून, त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (Promptness vigilance of Collector Manisha Khatri Tehsildar Girish Wakhare laborers received rightful ration grains Nandurbar News)

Taloda: Workers distributing cheap grain to migrant laborers in the presence of Tehsildar Girish Wakhare. Neighbor Supply Inspector Pramod Doifode, Anil Pardeshi
Jalgaon News : जमीनच फाटलीय.. कुठं कुठं करणार पॅचवर्क?

शासनातर्फे गरीब, गरजू नागरिकांना प्रधानमंत्री गरीब कल्याणकारी अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत आपापल्या गावातील स्वस्त धान्य दुकानात धान्य देण्यात येते.

मात्र अनेक नागरिकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी कुटुंबासह आपले मूळगाव सोडावे लागते. त्यामुळे कामानिमित्त इतरत्र स्थलांतरित झालेल्या नागरिकांना आपले रेशनचे धान्य मिळावे व त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी ‘एक देश एक रेशनकार्ड’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत तळोदा परिसरात कामानिमित्त स्थलांतरित झालेल्या लाभार्थ्यांना नुकतेच शिधावाटप करण्यात आले.

येथील श्रीकृष्ण खांडसरी येथे स्थलांतरित होऊन आलेल्या २३ लाभार्थी कुटुंबांना डिसेंबरचे प्रतिव्यक्ती सदस्यसंख्येनुसार गहू, तांदूळ व इतर धान्याचे वाटप करण्यात आले. या वेळी तहसीलदार गिरीश वखारे, पुरवठा निरीक्षक प्रमोद डोईफोडे, तालुका अभियंता अनिल परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वस्त धान्य दुकानदार परेश पाडवी यांनी लाभार्थ्यांना धान्याचे वाटप केले.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Taloda: Workers distributing cheap grain to migrant laborers in the presence of Tehsildar Girish Wakhare. Neighbor Supply Inspector Pramod Doifode, Anil Pardeshi
Jalgaon News : जमीनच फाटलीय.. कुठं कुठं करणार पॅचवर्क?

प्रशासनाची सतर्कता व तत्परता

काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी मनीषा खत्री तळोद्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्या वेळी त्या भेटी देऊन परतत असताना तळोद्यापासून जवळच असणाऱ्या व अक्कलकुवा रस्त्यावरील श्रीकृष्ण खांडसरी येथे त्यांना मजुरांचा पडाव दिसला. त्यांनी लागलीच त्या मजुरांची भेट घेत त्यांची चौकशी केली आणि त्यांनी लसीकरण केले आहे का, त्याचबरोबर त्यांना शासनाचे स्वस्त धान्य मिळते का, याबाबत चौकशी केली होती.

त्या वेळी त्या मजुरांनी ते मूळगावी धान्य घेत असल्याचे सांगितले, मात्र या ठिकाणी स्थलांतरित झाल्याने ते धान्य घेत नसल्याचे सांगितले. त्या वेळी जिल्हाधिकारी खत्री यांनी त्यांना ‘एक देश एक रेशनकार्ड’ योजनेविषयी माहिती देत या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले व प्रशासनाला याबाबत पुढाकार घेण्याचा सूचना केल्या.

त्यानुसार तहसीलदार वखारे यांनी लागलीच त्या मजुरांची चौकशी करीत ते लाभार्थी आहेत का नाही, याबाबत पडताळणी केली आणि त्यानंतर शासनाच्या योजनेनुसार त्वरित स्वस्त धान्य देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या व स्वतः त्या ठिकाणी जाऊन धान्याचे वाटप केले.

Taloda: Workers distributing cheap grain to migrant laborers in the presence of Tehsildar Girish Wakhare. Neighbor Supply Inspector Pramod Doifode, Anil Pardeshi
Jalgaon News : किरकोळ वादातून एका कामगाराचा खून

"जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या सूचनेनुसार श्रीकृष्ण खांडसरी येथील स्थलांतरित मजुरांची सविस्तर माहिती घेतली. ते मजूर या ठिकाणी आल्यावर त्यांच्या मूळगावी स्वस्त धान्य घेत नाहीत याची खातरजमा केली व त्यानंतर त्यांना लागलीच खांडसरीच्या परिसरात स्वस्त धान्याचे वाटप केले."

-गिरीश वखारे, तहसीलदार, तळोदा

Taloda: Workers distributing cheap grain to migrant laborers in the presence of Tehsildar Girish Wakhare. Neighbor Supply Inspector Pramod Doifode, Anil Pardeshi
Nashik News : थंडी वाढल्याने गहू, हरभरासाठी पोषक वातावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.