Nandurbar News : तळोद्यात टॅक्सी बंद ठेवून ‘हिट ॲन्ड रन’विरोधात आंदोलन

‘हिट ॲन्ड रन’ या केंद्र सरकारने आणलेल्या कायद्याविरोधात येथील टॅक्सीचालक व मालक संघटनेने बुधवार (ता. १०)पासून संप पुकारला आहे.
Taxi drivers protesting the law by stopping taxis 
Giving a statement to Tehsildar Girish Wakhare in the second photograph
Taxi drivers protesting the law by stopping taxis Giving a statement to Tehsildar Girish Wakhare in the second photographesakal
Updated on

Nandurbar News : ‘हिट ॲन्ड रन’ या केंद्र सरकारने आणलेल्या कायद्याविरोधात येथील टॅक्सीचालक व मालक संघटनेने बुधवार (ता. १०)पासून संप पुकारला आहे.

आपल्या टॅक्सी बंद ठेवून हा जाचक कायदा रद्द करण्याची मागणी तहसीलदार गिरीश वखारे यांना निवेदन देऊन करण्यात आली. (Protest against 'hit and run' by stopping taxis in Talodaya nandurbar news)

निवेदनाचा आशय असा : एखादा अपघात झाल्यास वाहनचालक अपघात झालेल्या व्यक्तीस घटनास्थळी सोडून गेल्यावर वाहनचालकावर १० वर्षे कारावास किंवा सात लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

अपघात हा कोणत्याही वाहनचालकाकडून नकळत घडत असतो, अपघात हे नजरचुकीने होतात. अपघात झाल्यावर जमाव मारहाण करण्याची भीती असते. या भीतीमुळे अपघात स्थळावरून चालक वाहन सोडून जातो.

त्यामुळे चालकास इतकी मोठी शिक्षा देणे हे त्यांच्यावर अन्यायकारक ठरते, असे तळोदा तालुका टॅक्सी वाहनचालक-मालकांनी म्हटले आहे.

Taxi drivers protesting the law by stopping taxis 
Giving a statement to Tehsildar Girish Wakhare in the second photograph
हार्दिक पांड्या T20 World Cup मध्ये खेळला तर रोहित शर्माची कॅप्टन्सी जाणार?

हा निर्णय सर्व वाहनचालकांवर अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर मागे घ्यावा अन्यथा बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारासुद्धा निवेदनातून देण्यात आला.

निवेदनावर टॅक्सीमालक व चालक संघटनेचे अध्यक्ष अजय सोनवणे, जहरीद्दोन शेख, हेमंत कलाल, राकेश पाटील, संजय तांबोळी, इब्राहिम शेख, सचिन गिरनार, मुकेश अहिरे, बबलू तिजविज, विनोद वाघ, वशीद शेख, नईम पठाण, संजय कलाल, नीलेश अहिरे, मझर शेख, अमानुद्दीन शेख, मनसुक चव्हाण, दिलीप कलाल, हसीम शेख आदींच्या सह्या आहेत.

Taxi drivers protesting the law by stopping taxis 
Giving a statement to Tehsildar Girish Wakhare in the second photograph
CM Eknath Shinde: कालच्या निकालातून आमच्यावर थोडा अन्याय झालाय; एकनाथ शिंदे असं का म्हणाले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()