Dhule Marathon 2024 : ‘रन फॉर पांझरा’च्या माध्यमातून जनजागृती

पोलिस कवायत मैदानावर ४ फेब्रुवारीला पहाटे पाचपासून धुळे मॅरेथॉन २०२४ सुरू होणार आहे.
During garbage collection in Panzra river on Sunday
During garbage collection in Panzra river on Sundayesakal
Updated on

Dhule Marathon 2024 : येथील पोलिस कवायत मैदानावर ४ फेब्रुवारीला पहाटे पाचपासून धुळे मॅरेथॉन २०२४ सुरू होणार आहे. त्यात ‘फिट धुळे, हिट धुळे’ हे मॅरेथॉनचे घोषवाक्य, तर धावपटू ‘रन फॉर पांझरा’ ही थीम साकारण्यासाठी धावतील.

त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या पुढाकाराने डिप क्लीन ड्राइव्ह व रन फॉर पांझरा याअंतर्गत रविवारी (ता. २८) पांझरा नदीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कडाक्याच्या थंडीतही सकाळी सातपासून पांझरा नदी स्वच्छतेसाठी हजारो हात एकवटले. (Public awareness through Run for Panzara dhule marathon news)

नद्यांच्या संवर्धनासाठी सर्वांना एकजुटीने पुढे यावे लागेल. नद्या हे आपले जीवन आहे. त्यांची काळजी घेणे आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. पांझरा नदी स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.

सातत्याने स्वच्छता मोहीम राबवावी, स्वच्छतेची चळवळ घरोघरी रुजवावी, असे आवाहन करीत जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘रन फॉर पांझरा’च्या माध्यमातून जनजागृती केली. महापालिका आयुक्‍त अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनात मोहिमेचे यशस्वी नियोजन करण्यात आले.

दोन हजारांवर हात गुंतले

छोटा पूल ते मोठा पूल या भागात नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. वीर सावरकर पुतळ्याजवळ शालेय व वसतिगृहातील विद्यार्थी, पोलिस अधिकारी व कर्मचारी, पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी, स्काउट-गाइड, एनसीसीचे विद्यार्थी स्वच्छतेसंबंधी प्रबोधनात्मक घोषणा देत संघटित झाले.

स्वच्छता गीतांच्या ठेक्यात पांझरा नदीपात्रात स्वच्छता सुरू झाली. मोहिमेत आठ ट्रॅक्टर, हायवा, तीन जेसीबी मशिन, पोकलँड मशिन कार्यरत होते. नदीपात्रात सरासरी दोन ते तीन हजार व्यक्ती उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. नदीपात्रात स्वच्छतेसह पाणी वाहते करण्यात आले. मोहिमेत सुमारे ५५ टन कचरा संकलित झाला.

कचरा संकलनावेळी उपस्थित श्रीकांत धिवरे, सौ. धिवरे, किशोर काळे व सहकारी.
कचरा संकलनावेळी उपस्थित श्रीकांत धिवरे, सौ. धिवरे, किशोर काळे व सहकारी.SYSTEM
During garbage collection in Panzra river on Sunday
Nashik MVP Marathon : उत्तर प्रदेशचा अक्षय कुमार ठरला नाशिक मविप्र मॅरेथॉनचा विजेता

स्वच्छतेत यांचे योगदान

जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदचे सीईओ शुभम गुप्ता आणि जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे सपत्नीक सहभागी झाले.

अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्‍त डॉ. संगीता नांदुरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपवनसंरक्षक नितीन सिंग, एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, वाहतूक पोलिस निरिक्षक भूषण कोते, अभिजित पाटील, एसआरपीचे समादेशक प्रल्हाद खाडे, अधिकारी चंद्रकांत पारसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता झाल्टे.

पोलिस दलाचे श्री. नेहुले, प्रशिक्षण केंद्राचे संचालक मधुकर मोरे, पांडुरंग डघळे, मनपाचे माजी उपायुक्‍त विजय सनेर, राजेंद्र छात्रालयाचे मधुकर शिरसाट, ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे, जगदीश देवपूरकर, कमर शेख, डॉ. योगेश पाटील, पंचशील विद्यार्थी वसतिगृह, लालबहादूर शास्त्री विद्यार्थी वसतिगृह, आदिवासी मुलांचे वसतिगृह, राजेंद्र छात्रालय.

जिजामाता कन्या विद्यालय, जो. रा. सिटी हायस्कूलचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघ, सुवर्णकार युवक संघटनेचे पदाधिकारी, रोटरी क्लब, महापालिकेचे अभियंता, स्वच्छता कर्मचारी व निरिक्षक, खातेप्रमुख आदींनी मोहिमेत योगदान दिले. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि मीडिया पार्टनर ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या साथीने मॅरेथॉन स्पर्धा होत आहे.

During garbage collection in Panzra river on Sunday
Dhule Marathon 2024 : मॅरेथॉनला शिक्षण संस्थांकडून ‘चिअर-अप’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.