Dhule News : शिरपुरात अतिक्रमणांवर चालला जेसीबी; कोंडीने घेतला मोकळा श्वास

Public Works Subdivision and municipality move JCB on encroachment on Burhanpur Ankleshwar highway dhule news
Public Works Subdivision and municipality move JCB on encroachment on Burhanpur Ankleshwar highway dhule newsesakal
Updated on

शिरपूर (जि. धुळे) : बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर वाहतूक करणाऱ्या वाहनांसह शिरपुरकरांसाठी कळीचा मुद्दा बनलेल्या अतिक्रमणांवर शनिवारी (ता. १८) सार्वजनिक बांधकाम उपविभाग आणि पालिकेने संयुक्त कारवाई करीत जेसीबी (JCB) फिरवला. (Public Works Subdivision and municipality move JCB on encroachment on Burhanpur Ankleshwar highway dhule news)

कारवाईदरम्यान तात्पुरती व कायमस्वरूपाची अतिक्रमणे तोडण्यात आली. टपऱ्या हटवण्यात आल्या. कारवाईदरम्यान काही अतिक्रमणधारक व अधिकाऱ्यांमध्ये वादावादीही झाली. पोलिस बंदोबस्तात उशिरापर्यंत काम सुरू असून ही कारवाई पुढे सुरू ठेवली जाणार आहे.

शहरातून बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्ग जातो. या रस्त्यावर निमझरी नाका ते करवंद नाका दरम्यान अतिक्रमणाचा सुळसुळाट झाला होता. भाजीविक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते, फेरीवाले यामुळे महामार्गाला अक्षरशः बाजाराचे स्वरूप येत होते.

अनेकदा वाहतुकीची कोंडी होऊन अवजड वाहने तासन्‌तास अडकून पडत होती. त्याचा उपद्रव शहरातील वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणात होता. ग्राहकदेखील वाहने महामार्गाला अगदी खेटून लावत खरेदीसाठी निघून जात असल्याने दररोजची वाहतुकीची कोंडी ही मोठी डोकेदुखी झाली होती.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

Public Works Subdivision and municipality move JCB on encroachment on Burhanpur Ankleshwar highway dhule news
Dhule News : महिन्याभरात नगरसेवक आपल्या दारी; भाजपचा उपक्रम!

आता अतिक्रमण झाल्यास गुन्हे

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिका प्रशासनाने दोन आठवड्यापूर्वी अतिक्रमणे स्वतः काढून घ्यावीत अन्यथा कारवाई करून काढण्यात येतील अशा नोटिसा बजावल्या होत्या.

मात्र त्याकडे गांभीर्याने न पाहता संबंधितांनी अतिक्रमण सुरूच ठेवले. त्यामुळे शनिवारी दिवसभर कारवाई करून जेसीबीद्वारे अतिक्रमणे काढण्यात आली. पोकलेनने टपऱ्या उचलून हटवण्यात आल्या. यापुढे अतिक्रमण केल्यास फौजदारी पात्र गुन्हा दाखल केला जाईल अशी तंबीही संबंधितांना देण्यात आली.

निर्मूलन पथकाशी वाद

आपले रोजगाराचे माध्यम हिरावले जात असल्याचा दावा करून फेरीवाल्यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकाशी वाद घातला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्यांना हटविले. पोलिस निरीक्षक अंसाराम आगरकर, पालिकेचे नगर अभियंता माधवराव पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कारवाईमुळे महामार्गाच्या दुतर्फा परिसर मोकळा झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. ही कारवाई तात्पुरती न राहता कायमस्वरूपी अतिक्रमणधारकांचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Public Works Subdivision and municipality move JCB on encroachment on Burhanpur Ankleshwar highway dhule news
ABHA Health Card : हजारावर आभा कार्डची नोंदणी; नगरसेवक नवले, उगलेंच्या प्रयत्नांना प्रतिसाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.