Nandurbar News : वाळूचे मोठमोठे डोंगर उभे करण्याची स्पर्धा; हातोडा येथील तापी नदी परिसरात वाळूचा वारेमाप उपसा

तापी नदी परिसरात तळोदा नंदुरबार रस्त्यावर नदीपात्रातून वाळूचा वारेमाप उपसा करून वाळूचे मोठमोठे डोंगर उभे करण्याची स्पर्धा लागली आहे.
Sand hills standing in Tapi river area. Tapi river vessel and machinery in the second photo.
Sand hills standing in Tapi river area. Tapi river vessel and machinery in the second photo.esakal
Updated on

Nandurbar News : हातोडा येथील तापी नदी परिसरात तळोदा नंदुरबार रस्त्यावर नदीपात्रातून वाळूचा वारेमाप उपसा करून वाळूचे मोठमोठे डोंगर उभे करण्याची स्पर्धा लागली आहे.

येथे वाळूचा उपसा दिवस-रात्र होत असल्याने पाण्याची पातळी दर दिवशी कमी होत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे नदी परिसरातील पर्यावरणीय परिसंस्थेलाही त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. (pumping sand from Tapi river bed posing threat to ecological system of area nandurbar news)

वाळूच्या उपशासाठी नदीपात्र अक्षरशः पिंजून काढले जात असल्याने भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होण्याची भीती पर्यावरणातील जाणकार व्यक्त करीत आहेत. तापी नदीच्या वाळूला संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे दर वर्षी तापी नदीतून वाळू काढण्याची स्पर्धा लागल्याचे चित्र आहे.

त्यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक व उलाढाल होत असल्याचे दिसून येते. त्यासाठी गुजरातमधील एकट्या हातोडा परिसरात पाच ते सहा ठिकाणी वाळू उपसाचे ठेके देण्यात आले असल्याचे समजते. त्यामुळे २४ तास येथे नदीपात्रातून वाळूचा उपसा करण्यात येतो. त्यासाठी मोठी यंत्रसामग्री वापरली जाते.

त्यात ठेकेदारांकडून वाळूचा साठा करण्याची स्पर्धाच लागल्याने वाळूचे मानवनिर्मित डोंगर उभे राहत आहेत. दुसरीकडे भूगर्भातील शंभर ते दोनशे फुटांवरील पाणी आज पिण्यासाठी वापरले जात आहे.

यात भूगर्भातील अधिक खोलवर गेलेले पाणी सिलिकॉन मिश्रित असल्याने अनेक आजार त्यातून होतात. त्या मानाने नदीचे पाणी हलके असते व ते पिण्यासाठी वापरले जाऊ शकते. त्यासाठी वाळूच्या होणाऱ्या अमाप उपशावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे.

Sand hills standing in Tapi river area. Tapi river vessel and machinery in the second photo.
Nandurbar Crime News : मंदाणे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; तब्बल 10 ठिकाणी घरफोड्या

भविष्यात तळोदा शहरासाठी मंजूर व काम प्रगतिपथावर असलेल्या हातोडा तापी पाणीपुरवठा योजनेसाठी तापी नदीचे पाणी शहरातील पाणीपुरवठा केंद्रात आणावे लागणार आहे.

मात्र वाळूचा असाच उपसा होत राहिला तर पाण्याची पातळी कमी होऊन पाणी साठविण्याची क्षमता जमिनीची कमी होईल, असे जाणकार सांगू लागले आहेत.

तापी नदीपात्रातून किती वाळूचा उपसा करावा यावर अभ्यास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निसर्ग गरजेची खनिजे व साधनसंपत्ती देत असतो. मात्र त्यावर काहीतरी नियंत्रण असणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. त्यात आर्थिक गणिते मांडणारे किती अजून उपसा करतात हेच पाहणे उत्सुकतेचे असल्याचे म्हटले जाते आहे.

"तापी नदीपात्रातून दिवसेंदिवस अवास्तव वाळू उपसा होत आहे. त्यामुळे भविष्यात भूगर्भातील पाण्याची कमतरता तापी खोऱ्यातील शेतकऱ्यांना भेडसावणार आहे. वाळू उपसा असाच दिवसेंदिवस वाढत राहिला व पाण्याची पातळी खोल खोल जात राहिली तर जिल्ह्यातील शेतीला व पिण्याचा पाणीयोजनांना फटका बसू शकतो."-डॉ. राजू झावराव यशोद, भूगोल विभाग, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, तळोदा

Sand hills standing in Tapi river area. Tapi river vessel and machinery in the second photo.
Nandurbar News : सुरत-अयोध्या आस्था एक्स्प्रेसवर नंदुरबार परिसरात दगडफेकीची तक्रार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.