Dhule News : पाचशे वर्षांनंतर अयोध्या येथे श्रीराम मंदिर नवनिर्माण आणि सोमवारी (ता. २२) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यातील रहीमपुरे या गावाचे नाव आता रामनगर होणार असल्याचा ऐतिहासिक ठराव येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने केला.
या नामांतरासाठी शासनस्तरावर यथोचित सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही आमगार जयकुमार रावल यांनी दिली. (Rahimpure is now renamed as Ramnagar dhule news)
रहीमपुरे येथे विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा झाला. यात आमदार निधीतून साकारलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन, दोन काँक्रिट रस्त्यांचे लोकार्पण.
श्री महादेव मंदिर सामाजिक सभागृहाची पायाभरणी, आरओ फिल्टर प्लांटचे लोकार्पण आदींचा सामावेश होता. खासदार डॉ. सुभाष भामरे अध्यक्षस्थानी होते.
बाजार बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, शिरपूर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व्ही. यू. पाटील, पंचायत समिती सभापती रणजित गिरासे.
माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, प्रभाकर पाटील, सरपंच क्रांती अरुण पाटील, उपसरपंच आशाबाई पाटील, दुल्लभ सोनवणे, नारायण गिरासे, विक्रम तायडे, विखुर्लेचे सरपंच गुलाब पाटील, व्ही. डी. पाटील, विखरणचे सरपंच महेंद्र पवार, वैभव निकम, सोनशेलूचे सरपंच प्रियांका बडगुजर, कुरकवाडेचे सरपंच प्रकाश पाटील.
जोगशेलूचे उपसरपंच किरण पाटील, सुरेश पाटील, माजी सरपंच पिंटू तिरमले, विनोद पाटील, अशोक पाटील, अधिकार पाटील, गोपाल भिल, सुरेश रामराजे, दगाजीराव पाटील आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.