Dhule Crime News : शहरातील नटराज टॉकीजजवळील रमजानबाबानगरात ‘एलसीबी’च्या पथकाने मंगळवारी (ता. १२) रात्री अवैध मिनी गॅसपंपावर छापा टाकला.
दोन जणांना ताब्यात घेत घटनास्थळाहून रिक्षासह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. (raid on illegal gas pump in Dhule crime news)
शहरातील रमजानबाबानगरात एका अतिक्रमित घरात साबीर शाह भोलू शाह हा घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस वाहनांमध्ये इंधन म्हणून अवैधरीत्या भरून देत असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने रात्री साडेअकराच्या सुमारास तेथे छापा टाकला.
तेव्हा एका विनाक्रमांकाच्या रिक्षामध्ये घरघुती सिलिंडरमधून गॅस भरताना दोन जण आढळले. गॅस भरणारा साबीर शाह भोलू शाह (रा. रमजानबाबानगर, ८० फुटी रोड, धुळे) व रिक्षामालक मोहम्मद कामरान गुलाम हमीद (रा. सर्व्हे क्रमांक १०, बादशाह खाननगर, मछली बाजार, मालेगाव, नाशिक) अशी दोघांनी नावे सांगितली.
संशयित दोघांकडे सिलिंडरचा कोणताही परवाना मिळून आला नाही. त्यांच्याकडून चार हजारांचे दोन गॅस सिलिंडर, पंधरा हजारांचा वीजपंप, स्प्रेअपर पंप, पाच हजारांचा इलेट्रॉनिक वजनकाटा, इलेक्ट्रिक बोर्ड व एक लाख वीस हजारांची विनाक्रमांकाची रिक्षा असा एकूण एक लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी सुशील शिंदे यांच्या फिर्यादीनुसार संशयित दोघांवर आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. श्री. शिंदे, योगेश राऊत, कमलेश सूर्यवंशी, देवेंद्र ठाकूर, जगदीश सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.