Dhule Rain News : धुळ्यासह तालुक्यात पावसाची दमदार हजेरी! भाजीपाल्याच्या दरात घसरणीची शक्यता

Rain Alert
Rain Alertesakal
Updated on

Dhule Rain News : शहरासह धुळे तालुक्यात गुरुवारी (ता. ६) रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. तो शुक्रवारी दिवसभरातही अधूनमधून चांगला बरसत होता. पावसाच्या हजेरीमुळे पिकांना दिलासा मिळाला, तर काही क्षेत्रात पाणी साचले.

परिणामी शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवस शेतीची कामे करणे कठीण होणार आहे. शेतातील साचलेले पाणी कमी झाले की पिकांना रासायनिक खतांची मात्रा देण्यास सुरवात होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले. (rain update heavy rain in dhule news)

दमदार पावसाच्या हजेरीमुळे दोन ते तीन दिवसांत शेतीकामांना वेग येणार असल्याने महिला मजूरांना रोजगाराची संधी मिळणार आहे. धुळे शहरात शुक्रवारी दुपारी दोन तास दमदार पाऊस झाला. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५४६ मिलिमीटर आहे. गेल्या दोन वर्षांत सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस झाला.

यंदाही अपेक्षित पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, संपूर्ण मृगनक्षत्र कोरडे गेले. नंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. परिणामी पेरण्या लांबल्या. पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांनी खोळंबलेल्या पेरण्या पूर्ण केल्या. आता पुन्हा पावसाने आठवड्यानंतर हजेरी लावली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले.

रोजगाराची संधी

धुळे तालुक्यातील सावळदे, रानमळा, तिखी, गरताड, वडजाई परिसरात गुरुवारी रात्री दमदार पाऊस झाला. पावसाच्या हजेरीमुळे शेती शिवारात पाणी साचले. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस शेतीची कामे ठप्प होतील. पाण्याचा निचरा झाल्यानंतर पिकांना रासायनिक खतांची मात्रा देण्यास सुरवात होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rain Alert
Nashik Sharad Pawar : शरद पवारांचे येवल्यातील ‘आशीर्वाद’चे परिणाम असतील मोठे : रोहित पवार

साहजिकच पुढील दोन ते तीन दिवसांत शेतीकामांना वेग येणार असल्याने महिला मजुरांनाही रोजगाराची संधी मिळणार आहे. दरम्यान, साक्रीत तीन दिवसांपूर्वी, शिरपुरला गुरुवारी आणि शिंदखेडा तालुक्यात ठिकठिकाणी शुक्रवारी पावसाने हजेरी लावली.

भाजीपाला महागलेला

लांबलेल्या पावसामुळे धुळे शहरात नाशिक जिल्ह्यातूनही भाजीपाल्याची आवक होत आहे. परिणामी, भाज्यांच्या दरात किलोमागे २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. दोन ते तीन दिवसाच्या पावसानंतर जिल्ह्यातून भाज्यांची आवक सुरू झाली की या दरात काहीशी घसरण होईल, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. लांबलेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे धुळे शहराच्या भाजीबाजारात जिल्ह्यातून ठिकठिकाणाहून होणारी आवक मंदावली आहे. परिणामी, नाशिक आणि अन्य जिल्ह्यातून भाजीपाला मागविण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे.

या स्थितीमुळे भाज्यांच्या दरात किलोमागे २० ते ३० रुपयांनी वाढ झाली. पावसाची हजेरी सुरू राहिल्यास जिल्ह्यातून भाज्यांची आवक सुरू झाली की दरात घसरण होऊ शकेल. सध्या भाजी बाजारात वांगे, टॉमेटो, मिरची, बटाटे, कारले, गिरले, दोडके, मेथी, दुधी, पोकळा या पालेभाज्या आणि फळभाज्या सरासरी ८० ते १०० रुपये किलोने विक्री होत आहेत.

Rain Alert
Dhule News : कोळसापाणीच्या चांदणीला आधार! भावाबहिणींची प्रशासन घेणार जबाबदारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.