Success Story : राष्ट्रीय सुरक्षा ॲकॅडमीची (एनडीए) परीक्षा आणि अवघड प्रशिक्षण पूर्ण करून आर्मीत लेफ्टनंटपद मिळविणाऱ्या राजशेखर सुरेश जाधव या तरुण अधिकाऱ्याची तवांग (अरुणाचल प्रदेश) येथे नियुक्ती झाली आहे.
शहरातील मिल परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातून लेफ्टनंटपदाला गवसणी घालणाऱ्या राजशेखर जाधव याचा मिल परिसर नागरिकांतर्फे क्रांती चौकात नागरी सत्कार झाला. (Rajasekhar Jadhav lieutenant in army was posted at Tawang dhule news)
राजशेखरचे वडील सुरेश जाधव रिक्षाचालक, तर आई कमलबाई जाधव या जिल्हा रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवारत आहेत. राजशेखरचे प्राथमिक शिक्षण शहरातील कनोसा कॉन्व्हेंटमध्ये झाले. नंतर अकरावी व बारावीचे शिक्षण त्याने सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट (औरंगाबाद) येथे पूर्ण केले.
शिक्षण घेतानाच त्याची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय सुरक्षा ॲकॅडमीसाठी निवड झाली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
खडकवासला (पुणे) येथील प्रबोधिनीमध्ये तीन वर्षांचे कसरतीचे प्रशिक्षण पूर्ण केल्याने त्याची लेफ्टनंटपदावर नियुक्ती झाली.
डेहराडून येथे आयएमएमध्ये परिवीक्षाधीन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राजशेखर याला बिहार रेजिमेंट मिळाले. त्याची नियुक्ती तवांग येथे झाली आहे.
आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून निवड झाल्याबद्दल राजशेखर व त्याच्या आई-वडिलांचे सर्वत्र कौतुक केले होत आहे. त्याच्या सत्कारावेळी नगरसेवक अमोल मासुळे, शीतल नवले, सुरेखा ओगले, किशोर सरगर, सुरेश जाधव यांच्यासह मिल परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.