Dhule News : पोटाच्या वीतभर खळगी भरण्यासाठी भाषा किंवा प्रदेश कधीही आडवा येत नाही. स्वत:ची मातृभाषा ‘मराठी’ नसतानाही व्यावसायिक परप्रांतीयांची मुले देखील प्रत्येक परीक्षेत अव्वल ठरत आहेत.
येथील मिठाईचे दुकान चालवत आपल्या संसाराचा गाडा ओढणाऱ्या राजस्थानी व्यावसायिकाच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत ८७.२० टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळवले आहे. परप्रांतीय ‘भरत’ ची भरारी इतरांना प्रेरणादायी आहे. (Rajasthani Bharat appeared in class 10 exams Aspiring to become software engineer 87.20 percent in Marathi school Dhule News )
येथील सी. डी. देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजस्थानी विद्यार्थी भरत प्रेमाराम प्रजापत हा दहावीचे शिक्षण घेत आहे. मुख्याध्यापक एस. ए. देवरे व दहावीच्या सर्व वर्ग शिक्षकांचे परिश्रम व मार्गदर्शनात अनेक विद्यार्थी चांगले गुण मिळवत यश मिळवत असतात.
भरत प्रजापत या अमराठी विद्यार्थ्याने शिक्षकांच्या मार्गदर्शनात प्रत्येक विषयात ८० पेक्षा अधिक गुण मिळविले. राजस्थानातील डोली (ता.पचपदरा.जि.बालोदरा) येथील भरतचे वडील प्रेमाराम मोहनराम प्रजापत मुळ रहिवासी आहेत. स्थानिक ठिकाणी पुरेसा रोजगार नसल्याने ते कुटुंबासह महाराष्ट्रात आले.
शिक्षणाबरोबरच कुटुंबास मदत
श्री. प्रजापत कुटुंबाचे बसस्थानक परिसरात ‘न्यू राजस्थान स्वीट मार्ट’ नावाचे मिठाईचे दुकान आहे. शिक्षणाबरोबरच भरत वडील प्रेमाराम व आई ऊर्मिला यांना व्यवसायात हातभार लावत असतो. अभ्यासाच्या बळावर यश मिळाले तो मानतो.
राजस्थानात कोरडवाहू शेती असल्याने प्रेमारामसह अन्य तीन भाऊ महाराष्ट्रात वेगवेगळे व्यवसाय करत आहेत. आई - वडील राजस्थान येथील गावी कोरड शेतीवर आपली उपजीविका भागवत असल्याची प्रेमाराम प्रजापत यांनी सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वडिलांच्या व्यवसायास हातभार
भरतने आपल्या वडिलांच्या व्यवसायास हातभार लावत अमराठी असून मिळवलेले यश इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरू शकते. शिक्षणासाठी मातृभाषाच हवी हा अट्टहास भरतच्या मनातही आला नाही. प्रजापत कुटुंबात विशेषतः दहावी पर्यंत कोणीच शिकले नसल्याने भरत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे समाधान कुटुंबास आहे.
"राजस्थानी असूनही मराठी माध्यमात शिकताना विशेष आनंद वाटतो. शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आदर्श शिक्षक असून त्यांचे मार्गदर्शक, प्रेरणेने इतके गुण मिळाले आहेत. भविष्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचा मानस आहे."
भरत प्रजापत, विद्यार्थी, म्हसदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.