Rakshabandhan 2023 : प्यार के दो तार से संसार बाँधा है..! रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात उत्साह

Rakshabandhan 2023
Rakshabandhan 2023 esakal
Updated on

Rakshabandhan 2023 : ‘बहना ने भाई की कलाई से प्यार बाँधा है, प्यार के दो तार से संसार बाँधा है...रेशम की डोरी से संसार बाँधा है...’ बहीण-भावाच्या नात्याची घट्ट वीण व्यक्त करणाऱ्या या ओळी आणि या नात्यातले हे प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा होणारा रक्षाबंधन सण दोन दिवसांवर आला आहे.

रक्षाबंधनाच्या या सणासाठी बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण आहे. राखी खरेदी करण्यासाठी बहिणींची पावले बाजारपेठेकडे वळलेली आहेत. (raksha bandhan festival 2023 sisters are buying rakhi for brother dhule news)

भारतातील सण-उत्सवांपैकी रक्षाबंधन हा बहीण-भावाचे नाते अधिक घट्ट करणारा एक महत्त्वाचा सण आहे. दर वर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घायुष्यासह व सुख लाभो म्हणून प्रार्थना करते आणि त्याच वेळी भाऊ आपल्या लाडक्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.

या दिवसाची भाऊ-बहीण आतुरतेने वाट पाहतात. रक्षाबंधनाचा हा सण दोन दिवसांवर आला आहे. बुधवारी (ता. ३०) रक्षाबंधन सण साजरा होणार आहे. त्यामुळे धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ फुलवाला चौक, आग्रा रोडसह साक्री रोड, पारोळा रोड तसेच देवपूर भागात विविध ठिकाणी विक्रेत्यांनी राख्यांचे स्टॉल्स लावले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rakshabandhan 2023
Rakshabandhan 2023 : यंदा बाजारात खास ‘ईव्हील आय’ राखी! आकर्षण राख्यांनी बाजारपेठ फुलली

आपल्या भावांसाठी राख्या खरेदी करण्यासाठी महिला, तरुणींची या स्टॉल्सवर सध्या गर्दी पाहायला मिळत आहे. बहीण-भावाच्या या नात्यासाठी राखीचा एक धागाही पुरेसा असला तरी सध्या जमाना बदलल्याने राख्यांच्या निवडीसाठीही खास वेळ दिला जातो.

याशिवाय रक्षाबंधनाला आपल्या बहिणीसाठी छानसे गिफ्ट देता यावे यासाठी विक्रेत्यांनी बेस्ट गॅझेट्स बाजारात आणले आहेत. अर्थात महागडी राखी किंवा महागडे गिफ्ट यापलीकडे भावाबहिणीच्या प्रेमाला अधिक महत्त्व आहे हेही तेवढेच खरे.

"दहा ते शंभर रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध आहेत. खासकरून बालकांसाठी कार्टून राखी दहा ते शंभर रुपयांपर्यंत आहे. त्यात छोटा भीम, मोटू-पतलू, स्पायडरमॅन, लाइटवाली राखी यंदाचे विशेष आकर्षण आहे. या राख्यांना विशेषतः बच्चेकंपनीकडून पसंती आहे. महिला, तरुण मुली आपापल्या आवडीनिवडीनुसार राख्या घेत आहेत." -आशिष पेडवाल, राखी विक्रेता

Rakshabandhan 2023
Rakshabandhan In Nepal : रक्षासूत्रात ब्रह्मा-विष्णु-महेश अन् गाईचा स्वर्ग कनेक्शन, असा साजरा होतो नेपाळमध्ये रक्षाबंधन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()