Dhule News : नगाव जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात 2 हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार : राम भदाणे

Ram Bhadane
Ram Bhadaneesakal
Updated on

Dhule News : अण्णासाहेब द. वा. पाटील प्रतिष्ठान, धुळे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्यातर्फे १४ जूनला पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय महारोजगार मेळावा होणार आहे.

मेळाव्यात मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, धुळे, नंदुरबार व जळगाव येथील विविध नामांकित कंपन्या नोकरभरतीसाठी येणार आहेत. (Ram Bhadane Information District level employment meeting in Nagaon on Wednesday Two thousand unemployed people will get employment Dhule News)

किमान दोन हजारांपेक्षा जास्त बेरोजगार तरुणांना ऑन दी स्पॉट नोकरी मिळणार असल्याची माहिती मुख्य संयोजक व भाजपचे धुळे ग्रामीण विधानसभा निवडणूकप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी दिली.

सदस्य भदाणे यांनी सांगितले, की राज्य सरकार उद्योग मंत्रालय व जिल्हा कौशल्य विकास केंद्र याकामी सहकार्य करीत आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील बेरोजगारांनी मेळाव्यास मूळ कागदपत्रे, पासपोर्ट फोटो, वैयक्तिक माहिती (बायोडाटा), आधारकार्डसह सकाळी नऊला नगाव येथील गंगामाई इंजिनिअरिंग कॉलेज येथे उपस्थितीचे राहायचे आहे.

पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते उद्‍घाटन

मेळाव्याचे उद्‍घाटन ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, सुभाष देवरे, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ram Bhadane
Dhule Municiapl Corporation : भरती, पदोन्नती करा, पण कायद्यानं!

...यांना मिळणार रोजगार

मेळाव्यात बँका, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ऑपरेटर, टेली कॉलर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, डाटा एंट्री ऑपरेटर, अकाउंटंट, सेक्युरिटी गार्ड, सुपरवायझर, वाहनचालक, कस्टमर केअर अशा पदांची भरती आहे.

दहावी, बारावी, आयटीआय, टेक्निकल डिप्लोमा बीई, बी.कॉम., बी. एस्सी, बी. फार्मसी, डी. फार्मसी, एमबीए, एमएससीआयटी, सर्व प्रकारचे डिप्लोमाधारक व सर्व प्रकारचे कौशल्य पदवीधारक युवक-युवतींना या ठिकाणी संधी मिळणार आहे.

ऑनलाइन नोंदणीसाठी

ऑनलाइन नावनोंदणीसाठी htttps://forms.gle/1RDCqa5CNeWonCLk7 या लिंकवर जाऊन नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विभाग, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र प्रशासकीय संकुल, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Ram Bhadane
NMU Agitation News : प्रश्नपत्रिका घोटाळ्याचा युवासेना, युवक काँग्रेसतर्फे निषेध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.