Ram Lalla Pran Pratishtha : शिंदखेड्यात श्रीरामाचा जयघोष! भव्य शोभायात्रा अन विविध धार्मिक कार्यक्रम

अयोध्येत श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. २२) शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.
Students performing lazy dance in the parade. Replica of Shri Ram Temple
Students performing lazy dance in the parade. Replica of Shri Ram Templeesakal
Updated on

शिंदखेडा : अयोध्येत श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. २२) शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत भगवान श्रीरामाच्या मूर्तीसह राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, वानर सेना देखावा यासह रामायणामधील विविध पात्रांच्या सजीव देखाव्यांचा समावेश होता.

महिलांचा व युवतींचा लक्षणीय सहभाग होता. आदिवासी नृत्य, ताशा, ढोलपथक, डीजे, एकतारी वाद्य, भजनी मंडळ, लेझीमपथक, मलखांब, डफ, शहनाई आदी वाद्ये व ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘बजरंग बली की जय’, ‘जय श्रीराम’ या घोषाने परिसर दुमदुमत होता. या वेळी श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीने भाविकांचे लक्ष वेधले होते. (Ram Lalla Pran Pratishtha Shree shout in Shindkheda Grand procession and various religious events dhule)

शहरातील विविध शाळांनी आपल्या आपल्या पथकाचे सादरीकरण व सजीव देखावे सादर केले होते. येथील किसान हायस्कूलपासून शोभायात्रेस सायंकाळी पाचला सुरवात झाली.

भगवा चौकामार्गे स्टेशन रोड ,शिवाजी चौक, कचेरी चौक, गांधी चौक, मेन रोड, देसाई गल्ली, रथ चौक, माळीवाडा, शनी मंदिर चौक, गणपती चौक, गांधी चौक व दक्षिणमुखी मारुती मंदिरात समारोप करून महाआरती करण्यात आली.

सायंकाळी शोभायात्रा पाहण्यासाठी महिलांची व नागरिकांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती. शोभायात्रेचे शहरात ठिकठिकाणी चौकाचौकांत जोरदार स्वागत करण्यात आले. शोभायात्रेमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या शोभायात्रेमध्ये सकल हिंदू समाज सहभागी झालेला दिसून आला.

शहरातील रस्ते, गल्ल्या भगव्या पताकांनी सजले होते. अंगणात रांगोळ्या काढण्यात आल्या. मंदिरे विद्युत दिव्यांच्या रोषणाईने उजळले होते.

Students performing lazy dance in the parade. Replica of Shri Ram Temple
Ram Lalla Pran Pratishtha : दीपोत्सव, शोभायात्रा, रामनामाने भारावले मनमाडकर; महाआरती, लाडूंचे वाटप

रामरक्षा, हनुमान चालीसापठण

शहरातील विविध मंदिरांमध्ये तसेच कॉलनी परिसरात भाविकांनी रामरक्षा व हनुमान चालीसाचे पठण केले. दक्षिणमुखी मारुती मंदिरात प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या वेळी सर्व जातींच्या ४७ जोडप्यांकडून रामयज्ञ करून होमहवन करण्यात आले.

दोन तास मोफत चहा

येथील बसस्थानक परिसरातील बजरंग टी स्टॉलतर्फे सोमवारी प्रवाशांना सकाळी दोन तास मोफत चहा देण्यात आला.

दुपारी शहरात शुकशुकाट

अयोध्येत रामजन्मभूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या होत असलेला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सुरू असताना शहराच्या प्रत्येक गल्लीत शुकशुकाट होता. प्रत्येक रामभक्त आपल्या घरामध्ये टीव्हीसमोर बसून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये सहभागी झालेला दिसून आला.

Students performing lazy dance in the parade. Replica of Shri Ram Temple
Dhule News : धुळे, नंदुरबारकरांनी नाशिक ओलांडले! मराठा समाजबांधवांची आरक्षणप्रश्‍नी जरांगेंना पाठिंब्यासाठी पदयात्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.