नवापूर (जि. नंदुरबार) : तालुक्यातील रंगावली मध्यम प्रकल्प, सुळीपाडा व खेकडा लघुपाटबंधारे या प्रकल्पाच्या डाव्या, उजव्या दोन्ही मुख्य कालव्यांची तसेच, ऑपरेटिंग सिस्टमची दुरुस्तीचे काम त्वरित करावे. (Rangavali Medium Project Minor Irrigation Projects should be repaired Bharat Gavit letter to Chief Engineer nandurbar news)
खेकडा लघुपाटबंधारे योजनेच्या कालव्याच्या कामाबाबत तातडीने ठोस कार्यवाही करावी अन्यथा १० एप्रिलला धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी रास्ता रोको आंदोलन करतील असे पत्र जळगाव तापी पाटबंधारे विकास महामंडळ मुख्य अभियंता यांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी दिले.
भरत गावित यांनी पत्रासोबत रंगावली मध्यम प्रकल्प अंतर्गत सिंचनक्षेत्रात येणारी, चौकी, वाघळापाडा, घुडीपाडा, मोरथवा, आंबाफळी, उंबर्डी, प्रतापपुर, खळीबर्डी, वडकळंबी, रायपूर, बोरविहीर, बोकळझर तर वावडी लघुपाटबंधारे योजना, सुळीपाडा सिंचनक्षेत्रातील सुळी, रायंगण डोगीफळी, रायंगण तसेच लघुपाटबंधारे योजना, खेकडा येथील शेतकऱ्यांचे निवेदन दिले आहे.
रंगावली मध्यम प्रकल्प (ता. नवापूर ) १७ ऑगस्ट २०१८ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे रंगावली नदीस महापूर आला होता. त्यात उजव्या व डाव्या पाटकालव्यांचा भराव बऱ्याच ठिकाणी वाहून गेला आहे. प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असून चार वर्षापासून कालव्याद्वारे शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही. मुख्यगेट (विमोचक) देखील नादुरुस्त असल्यामुळे प्रकल्पातील पाणी कालव्याद्वारे सोडता येत नाही.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
याबाबत तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांनी सरकारकडे पत्राद्वारे दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता नवापूर यांच्या हलगर्जीपणामुळे दुरुस्तीच्या कामास मंजुरी मिळालेली नाही. सुळीपाडा लघु पाटबंधारे योजनेचा मुख्य कालवा पूर्णपणे वाहून गेल्याने कालवाच शिल्लक नाही. कालव्यावरील गेट ऑपरेटिंग सिस्टमचे अवशेष राहिलेले नाही. असे निवेदनात नमूद केले आहे.
वारंवार निवेदनांना केराची टोपली
खेकडा लघुपाटबंधारे योजनेचे मुख्य कालव्याचे गेट ऑपरेटिंग सिस्टीम नादुरुस्त झाल्यामुळे धरणातील पाणी वाहत असल्यामुळे २५ ऑगस्ट २०२२ ला तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी मोर्चा नेऊन निवेदन दिले होते.
याबाबत १५ नोव्हेंबरला धुळे पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता नवापूर, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना गेटदुरुस्ती साठी निवेदन दिले होते. मात्र अद्याप गेट दुरुस्ती झाली नाही. मागणीला केराची टोपली दाखविली जाते. नवापूर येथील पाटबंधारे कार्यालयात कोणताही कर्मचारी उपस्थित राहात नाहीत. उपअभियंता यांना निलंबित करावे अशी शेतकरी आणि भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावित यांनी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.