Raosaheb Danve News : रेल्वेस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी ‘अमृत भारत स्थानक’ योजना राबविण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला.
या योजनेत राज्यातील ४४ रेल्वेस्थानकांचा समावेश असून, भुसावळ-सुरत लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या नंदुरबारचा रेल्वे स्थानकाच्या समावेश नाही.(Raosaheb Danve statement about Nandurbar station to be included in Amrit Bharat scheme news)
रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी अमृत भारत योजना सुरू असून, त्यात भुसावळ-सुरत लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या नंदुरबारचा समावेश करण्याची मागणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करताच त्यांनी हिरवा कंदील दाखवत लवकरच पुढील यादीत नंदुरबार रेल्वेस्थानकाचा समावेश करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दरम्यान, योजनेचा आढावा घेण्यासाठी व रेल्वेच्या विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री रावसाहेब दानवे भुसावळ-सुरत विशेष दौऱ्यावर आले असता त्यांनी नंदुरबार स्थानकाला धावती भेट दिली.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दानवे यांच्याशी रेल्वेच्या विविध प्रश्न व समस्यांविषयी चर्चा करीत नंदुरबार स्थानकाचा अमृत भारत स्थानक योजनेत समावेश करण्याची मागणी केली. यावर दानवे यांनी योजनेच्या पुढील यादीत नंदुरबार स्थानकाचे नाव समाविष्ट करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.