Nandurbar Crime News : नवापूरात रेशनचा तांदूळ पकडला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

crime
crimeesakal
Updated on

Nandurbar Crime News : राज्य भरारी पथक अन्न व नागरी पुरवठा विभाग मुख्य निरीक्षक विनायक निकम, नवापूर पुरवठा निरीक्षक दिलीप पाडवी यांच्या संयुक्त छाप्यात रेशनिंग तांदूळ सदृश्य १४० पांढऱ्या रंगाच्या गोण्या भरलेल्या छाप्यात आढळल्या.

दोन लाख ७४ हजार २६० रुपये किमतीचा तांदूळ असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आल्याने नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ration rice seized in Nawapur case registered against four Nandurbar Crime News)

नवापूर शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग धुळे सुरत जवळ गोपाल राईसच्या बाजूला असलेल्या एका गोदामात २० एप्रिलला सकाळी अकराला मुख्य निरिक्षक अधिकारी विनायक निकम (शिधावाटप निरीक्षक), पवनकुमार कुंभले, राहुल इंगळे, प्रभाकर चौघुले, दीपक कदम, सुधीर गव्हाणे, राजेंद्र पाटील, पुरवठा निरीक्षक दिलीप पाडवी आदींच्या पथकाने छापा टाकला.

त्यात दोन लाख ७४ हजार २६० रुपये किमतीचे एकूण १४० नग प्लॅस्टिकच्या गोण्या, त्यात सुमारे सात हजार किलो वजनाचा तांदळाचा साठा आढळला असून प्रत्येकी गोणी ५० किलोची आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

crime
Crime news : जालन्यात तीन हातभट्ट्या उद्ध्वस्त

या बाबत नवापूर पुरवठा निरीक्षक दिलीप सखाराम पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनोजकुमार रमेशचंद्र अग्रवाल (वय ४४, रा. फुलवाडी फलीया उच्छल, ता. उच्छा, जि. तापी, गुजरात), गोपाल हुकुमचंद अग्रवाल, राकेश हुकुमचंद अग्रवाल, कमलेश नाथुलाल अग्रवाल (तिघे रा. नवापूर ) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

"पुरवठा विभागाच्या धावत्या पथकाने तालुक्यातील गोदामांना भेट दिली. सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावरील एका गोदामात मूग, हरभरा तसेच तांदळाच साठा केल्याचे आढळून आले. त्यांनी सादर केलेली देयके व इतर दस्तावेज यात तफावत असल्याने या धान्यसाठा बाबत शंका उपस्थित होत असल्याने धान्याचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आलेले आहेत. तालुक्यातील प्रत्येक रेशन दुकानदारांची तपासणी करण्यात येईल. दोषी आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल. विनापरवाना गोदामावर कारवाई साठी मार्केट कमिटीला सांगण्यात आले आहे." - मंदार कुलकर्णी, तहसीलदार नवापूर

crime
Solapur Crime : हवेत गोळीबार करून जीवे मारण्याची धमकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.