उत्तर महाराष्ट्र : बंडखोर ‘एमआयएम’ने युतीचे गणित बिघडवले! | Election Result 2019

उत्तर महाराष्ट्र : बंडखोर ‘एमआयएम’ने युतीचे गणित बिघडवले! | Election Result 2019
Updated on

पुणे : लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील शतप्रतिशत यशाचे युतीचे गणित बंडखोर अन्‌ 'एमआयएम'ने बिघडवले. धक्कादायक म्हणजे, भाजपने उमेदवारी नाकारलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणींचा पराभव झाला. खडसे आणि महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यात भाजपच्या जागांमध्ये 2014 च्या तुलनेत दोनने घटच झाली. 

महेंद्र महाजन 

भाजपला तीनही जागा निवडून देणाऱ्या नाशिकला भाजपने मंत्रिपद दिले नाही. मात्र, भाजपने नाशिकमध्ये एका जागेची भर टाकली. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवारांनी प्रचाराची सुरवात नाशिकमधून केली. त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला. राष्ट्रवादीची अवस्था "गड आला अन्‌ सिंह गेला' अशी झाली. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी येवल्यातून यशाला गवसणी घातली, तरीही "हॅट्ट्रिक'च्या उंबरठ्यावरचे त्यांचे पुत्र पंकज नांदगावमधून पराभूत झाले.

शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांचा मुलगा योगेश यांना देवळालीतून हरवत राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे "जायंट किलर' ठरल्या. ए. टी. पवार म्हणजे पक्ष असे समीकरण असलेल्या कळवण-सुरगाणामधून त्यांचा मुलगा नितीन यांनी राज्यातील सर्वात ज्येष्ठ आमदार होण्यासाठी मोर्चेबांधणी केलेले मार्क्सनवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जे. पी. गावित यांना पराभवाचा धक्का दिला. 

उत्तर महाराष्ट्रात "एमआयएम'ने मुस्लिमबहुल मालेगाव मध्यसह धुळे शहरातून यश मिळविले. मालेगाव मध्यमधून राष्ट्रवादीचा त्याग करत "एमआयएम'ची उमेदवारी करणारे मौलाना मुफ्ती ईस्माईल यांनी काँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांचा पराभव केला. धुळ्यात आमदार अनिल गोटे आणि राजवर्धन कदमबांडे यांच्या लढाईत "एमआयएम'चे माजी उपमहापौर डॉ. फारुक शाह यांनी बाजी मारली. भाजपचे मंत्री जयकुमार रावल, शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे यांनी विधानसभेत पुन्हा "एंट्री' केली. रावेरमधून काँग्रेसचे शिरीष चौधरींनी "कमबॅक' केले. रोहिणी खडसेंचा पराभव बंडखोर चंद्रकांत पाटलांनी केला. 

काँग्रेसचे माजी मंत्री अमरीश पटेल हे भाजपमध्ये, चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेत प्रवेशकरते झाल्याने काँग्रेसची प्रामुख्याने धुळे, नंदूरबारमध्ये नाजूक अवस्था होती. शिरपूरचे आमदार काशीराम पावरांनी भाजपची उमेदवारी करत बाजी मारली. अशा स्थितीतही काँग्रेसने अस्तित्व राखले.

माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचा मुलगा शिरीष, के. सी. पाडवी, धुळे ग्रामीणचे कुणाल पाटील यांनी यश मिळवले. काँग्रेसची नाशिक जिल्ह्यातील एक जागा घटली, तरीही त्यांनी जळगावमधून एक जागा मिळवली. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महाराष्ट्र-गुजरात पाणी प्रश्न , केळी-द्राक्षे-डाळिंब-कांदा-भाजीपाल्यासह शेतीमालाला न मिळालेला भाव याही मुद्यांवर विशेष चर्चा झाली. 

पक्षीय बलाबल 

राजकीय पक्ष 2019 2014 
भाजप 13 14 
शिवसेना 6 7 
राष्ट्रवादी 7 5 
काँग्रेस 5 7 
एमआयएम 2 0 
अपक्ष 2 1 
माकप 0 1 

माणिकराव गावितांच्या कुटुंबीयांना नाकारले

काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावितांच्या कुटुंबीयांना मतदारांनी नाकारले. त्यांच्या कन्या निर्मलाताई गावितांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेकडून इगतपुरी-त्र्यंबकेश्वारमधून उमेदवारी केली.

राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात काँग्रेसला हिरामण खोसकर हे उमेदवार दिले आणि खोसकरांनी त्यांचा पराभव केला. गावित यांचा मुलगा भरत यांच्यासाठी नवापूरमधून काँग्रेसकडे उमेदवारीचा आग्रह होता. मात्र सुरुपसिंग नाईकांना पक्षाने शब्द दिला असल्याने भरत भाजपमध्ये गेले. तेथे त्यांचाही पराभव झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.