धुळे : शहरातील नटराज चित्रमंदिर परिसरातील दत्तवाडी, मनमाड जीन, काझी प्लॉट, नित्यानंदनगर, महालक्ष्मी कॉलनी, लोकमान्यनगर यासह अन्य परिसरातील जागांवर वक्फ बोर्डने हक्क सांगितला आहे.
मात्र, संबंधित जागा ९९ वर्षांच्या कराराने जागामालकाने दिल्याचा तेथील रहिवाशांचा दावा आहे. याअनुषंगाने वक्फ बोर्डच्या जागेवरील रहिवाशांच्या नावे संबंधित मालमत्ता करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत महासभेत निर्णय अपेक्षित आहे. (Regarding Rights of land Proposal before General Assembly of Municipality Dhule News)
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
वक्फ बोर्डाच्या दाव्यामुळे या भागातील रहिवाशांना खरेदी-विक्री, बँक तसेच महापालिकेसह इतर विभागांकडून कोणत्याही प्रकारचा नाहरकत दाखला मिळत नाही. शिवाय, बांधकाम परवानगीही मिळत नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामे वाढीस लागली आहेत. यातून महापालिकेचेही आर्थिक नुकसान होत आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत शासनाचे वेळोवेळी निर्णय व परिपत्रक आले आहेत.
यात अतिक्रमणधारकांना रहिवास जागेवर पुनर्वसन करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. शासन आदेशानुसार संबंधित रहिवाशांच्या ताब्यातील जागा भोगवटादाराने करून द्यावयाची आहे. या संदर्भात महापालिकेने १७ सप्टेंबर २०१९ ला ठराव पारित केला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मालमत्ता तेथील रहिवाशांच्या नावे करण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्याचा विषय महासभेपुढे आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.