Dhule Marathon 2024 : धुळे मॅरेथॉनच्या नोंदणीस सुरवात; ऑफलाइन सुविधेच्या लाभाचे आवाहन

जिल्हा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि मीडिया पार्टनर ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे येथील पोलिस कवायत मैदानावर ४ फेब्रुवारीला पहाटे पाचला धुळे मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे.
Officials and dignitaries present at the meeting in the Superintendent of Police office regarding marathon.
Officials and dignitaries present at the meeting in the Superintendent of Police office regarding marathon.esakal
Updated on

Dhule Marathon 2024 : जिल्हा पोलिस दल, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि मीडिया पार्टनर ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे येथील पोलिस कवायत मैदानावर ४ फेब्रुवारीला पहाटे पाचला धुळे मॅरेथॉन (सीझन- २) स्पर्धा होणार आहे.

त्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध झाली असून, धुळेकरांसह धावपटूंनी नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले. (Registration for Dhule Marathon 2024 start from today dhule news)

मॅरेथॉनच्या नियोजनासंदर्भात पोलिस अधीक्षक कार्यालयात अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. तीत अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी, सहकारी अधिकारी, समितीचे प्रतिनिधी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

मॅरेथॉनचे वैशिष्ट्य

मॅरेथॉनमध्ये २१.१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन), १० किलोमीटर (टायमिंग रन), ५ किलोमीटर (ड्रीम रन) आणि तीन किलोमीटर (फॅमिली रन) असे चार ग्रुप आहेत. या वेळी दोन प्रकारच्या एन्ट्री ठेवण्यात आल्या आहेत.

सशुल्क नोंदणीधारक स्पर्धकाला टी-शर्ट, टायमिंग बीब, मेडल, एनर्जी ड्रिंक, पाणी, नाश्‍ता व ई-सर्टिफिकेट तसेच मोफत नोंदणी करणाऱ्या स्पर्धकाला बीब, मेडल, एनर्जी ड्रिंक, पाणी, नाश्‍ता व ई-सर्टिफिकेट मिळणार आहे.

टी-शर्टसह सशुल्क नोंदणीसाठी २१ किलोमीटर व १० किलोमीटरला प्रतिव्यक्ती शंभर रुपये, तर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरसाठी प्रतिव्यक्ती ५० रुपये नोंदणी शुल्क असेल. यात फक्त २१.१ व १० किलोमीटरसाठी टायमिंग चिप देण्यात येईल.

Officials and dignitaries present at the meeting in the Superintendent of Police office regarding marathon.
Dhule Marathon 2024 : धुळ्यात 4 फेब्रुवारीला `रन फॉर पांझरा`; नीटनेटके आयोजन

नोंदणीसाठी असे संपर्क

‘फिट धुळे हिट धुळे’ हे घोषवाक्य आणि‍ ‘रन फॉर पांझरा’ या थीमवर आधारित मॅरेथॉन स्पर्धेत नोंदणीसाठी https://dhulemarathon.iq301.com/ ही ऑनलाइन नोंदणी लिंक आहे.

ऑफलाइन अर्जासाठी स्पर्धकांनी पोलिस मुख्यालय, धुळे, जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणी, तसेच ‘सकाळ’ कार्यालय, बर्वे कॉम्लेक्स, जिजामाता हायस्कूलसमोर, धुळे, कांकरिया मेडिकल, दत्त मंदिर चौक, हॉटेल पंकजशेजारी, देवपूर, धुळे, क्विन्झ स्पा ॲन्ड ब्यूटी केअर, पद्‌मश्री टॉवर, विजय पोलिस कॉलनी बोर्डजवळ, वाडीभोकर रोड.

देवपूर, धुळे, सुनील मेडिकल, अभय हॉस्पिटल शेजारी, ८० फुटी रोड, धुळे, माय होम शोरूम, वरचा मजला, महात्मा गांधी मार्केट, शिरपूर, रेवती लेडीज शॉप, बँक ऑफ महाराष्ट्रजवळ, दोंडाईचा, धनंजय लक्ष्मण सोनवणे, तालुका क्रीडा मार्गदर्शक, तालुका क्रीडासंकुल, तहसील कार्यालयाशेजारी, साक्री येथे संपर्क साधावा.

Officials and dignitaries present at the meeting in the Superintendent of Police office regarding marathon.
Nashik Youth Festival : PM मोदी यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून हेलिपॅड अन सभास्थळाची पाहणी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()