कापडणे (जि. धुळे) : गणेशोत्सव अवघा २५ दिवसांवर आला असून, मूर्तिकार अखेरचा हात फिरविण्यात गर्क आहेत. बाजारात मूर्ती पोचविण्यासाठीदेखील धडपड सुरू आहे. जिल्ह्यातील गणेशमूर्तींना राज्यभरात मागणी आहे.
येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक तथा मूर्तिकार पंढरीनाथ कुंभार, गणेश कुंभार आणि कैलास कुंभार यांच्या गणेशमूर्तींना खानदेशासह पुणे, नाशिक येथून मागणी वाढली आहे. या वर्षी पर्यावरणपूरक शाडोच्या गणेशमूर्ती बनविण्याकडे कारागिरांचा कल आहे. कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने गणेशप्रेमींकडूनही पर्यावरणपूरक मूर्तींची आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे. (relaxation of Corona rules there is big demand for Ganesha idols Dhule Latest Marathi News)
सुकर आणि कमी मेहनतीत पीओपीच्या मूर्ती बनविल्या जातात. शासनाच्या बंदीमुळे मूर्तिकार शाडो मातीला प्राधान्य देत आहेत. तरीही पीओपीच्या एका पिशवीचे भाव १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत.
शाडो मातीची पिशवीचा भाव २५० रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. वीस लिटर रंगाची बादलीही दोन हजारांवरून चार हजारांवर पोचली आहे. त्या तुलनेत मूर्तींचे भाव वाढले नसल्याचे मूर्तिकार गणेश कुंभार व विद्या कुंभार यांनी सांगितले.
जिल्ह्यात पाचशेवर मूर्तिकार
धुळे जिल्ह्यात पाचशेपेक्षा अधिक गणेश मूर्तिकार आहेत. केवळ धुळे शहरात शंभरावर आहेत. कोरोनामुळे मूर्तिकारांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला होता. या वर्षी सर्वच मूर्तिकार नव्या उमेदीने मूर्ती बनविण्यात गर्क झाले आहेत. येथील मूर्तींना खानदेशासह पश्चिम महाराष्ट्रात अधिक मागणी असते.
"या वर्षी कोरोना नियम शिथिल झाल्याने गणेशमूर्तींना मोठी मागणी राहील. मूर्ती बनविण्याचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याचशा मंडळांनी आगाऊ नोंदणी केली आहे. मोठ्या मूर्तीपेक्षा मध्यम मूर्तींना अधिक मागणी आहे." -गणेश कुंभार, मूर्तिकार, कापडणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.