Dhule News : अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडा; अन्यथा आंदोलनाचा शेतकरी अन सरपंचांचा इशारा

अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Various sarpanches and farmers giving a statement to Collector Abhinav Goyal regarding water release.
Various sarpanches and farmers giving a statement to Collector Abhinav Goyal regarding water release.esakal
Updated on

कुसुंबा : सद्यःस्थितीत दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला असून, परिसरातील विहिरींनी तळ गाठायला सुरवात केली आहे. अशा परिस्थितीत अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यात डावा कालवा परिसरात येणाऱ्या गावांच्या सरपंचांचाही समावेश आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (Release water from left canal of Akkalpada Dam Otherwise farmers movement warned dhule news)

निवेदनाचा विषय असा ः आम्ही मौजे भदाणे, खंडलाय बुद्रुक, खंडलाय खुर्द, बाबुर्ले, शिरधाणे, अकलाड, मोराणे, कावठी, नवलाणे, मेहेरगाव, निमडाळे, गोंदूर येथील डावा कालवा परिसरातील शेतकरी असून, आमच्या गावांना दुष्काळी स्थिती आहे.

शेती व जनावरांचा व पिण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. आम्ही वेळोवेळी सर्व गावांच्या सरपंचांनी आपल्याला निवेदन दिले आहे व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व खासदार डॉ. सुभाष भामरे.

शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल अक्कलपाडा धरणावर धुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीचे उद्‍घाटन १ जानवेरीला करायला आले असता आपल्यासमोर निवेदन त्यांना दिले होते.

Various sarpanches and farmers giving a statement to Collector Abhinav Goyal regarding water release.
Dhule Election News : जिल्ह्यात 17 लाख 27 हजारांवर मतदार

जिल्हाधिकारी कार्यालयात अक्कलपाडा धरणाचे पाणी सोडण्याबाबत आढावा बैठक खासदार डॉ. भामरे यांच्यासमवेत दोन ते तीन वेळा घेण्यात आली.

तरीसुद्धा आपण डाव्या कालव्याला पाणी सोडलेले नाहीड परंतु आपण डाव्या कालव्याच्या शेतकऱ्यांचा दुष्काळाचा विचार केला नाही.

आम्हा सर्व शेतकरी विनंती करतो, की आम्हाला ३० जानेवरीपर्यंत पाणी सोडले नाही तर आम्ही वरील गावांतील डाव्या कालव्यातील सर्व शेतकरी ३१ जानेवारीला मौजे भदाणे फाटा येथे रास्ता रोको करणार आहोत.

या वेळी अकलाडचे सरपंच अजय माळी, भदाणेचे सरपंच भीमराव करनरे, सरपंच नितीन सोनवणे, कावठी शेतकरी, ग्रामस्य शरद शिंदे, मेहेरगावचे भाऊसाहेब भामरे, निमडाळे सरपंच सुधाकर सैंदाणे, बापू वाघ, जोगाभाऊ करनर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Various sarpanches and farmers giving a statement to Collector Abhinav Goyal regarding water release.
Dhule News : धुळ्यात साडेतीन हजार लाडूंचा प्रसाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.