Nandurbar News : नवापूरात बंदिस्त 128 जनावरांची सुटका; जनावरांची गोशाळेत रवानगी

Animal Smuggling
Animal Smugglingesakal
Updated on

Nandurbar News : अवैधरीत्या बांधून ठेवलेल्या १२८ गोवंश जनावरांची नवापूर पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. नवापूर शहरातील इस्लामपुरा भागात अवैधरीत्या जनावरांना बांधून ठेवलेले होते. त्याची किंमत ९ लाख ६७ हजार आहे. त्यांची गोशाळेत रवानगी करण्यात आली.

पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैध जनावरांची वाहतूक, खरेदी विक्री होणार नाही याबाबत सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या.(Rescue of 128 captive animals in Navapur Dispatch of animals to Goshala 9 lakh 67 thousand price Nandurbar News)

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र बी. जी. शेखर पाटील यांच्या आदेशान्वये २६ जूनच्या रात्री अकरा ते २७ जूनच्या सकाळी पाचच्या दरम्यान कोंबिंग, नाकाबंदी ऑपरेशन राबविण्यात आले. रात्री नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना नवापूर शहरातील इस्लामपुरा भागात अवैधरीत्या जनावरांना बांधून ठेवलेले आहे.

अशी माहिती मिळाली. सदरची माहिती त्यांनी नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना देत कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व पथकाने नवापूर शहरातील इस्लामपुरा कसाईवाडा परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबविले असता वेगवेगळ्या ठिकाणी लहान बंदिस्त खोल्यांमध्ये ९ लाख ६७ हजाराची १२८ गोवंश जनावरे बांधलेल्या अवस्थेत मिळून आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Animal Smuggling
Solapur News : जोडणी नसताना नळ आकारणीची पाठविली बिले; महापालिकेकडे २५० तक्रारी दाखल

मिळून आलेल्या सर्व जनावरांची पोलिस पथकाने सुटका करुन त्यांना गोशाळेत पाठविले. जनावरांना कत्तलीसाठी बांधून ठेवणाऱ्याविरोधात नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलिस उप निरीक्षक अशोक मोकळ, दादाभाऊ वाघ, दिनेशकुमार वसुले, सुरेंद्र पवार, अमोल जाधव, प्रेमचंद जाधव, विक्की वाघ, दिनेश बावीस्कर, रणजित महाले, गणेश बच्छे, पवन काकरवाल, प्रमोद पाटील, समाधान केंद्रे, हेमंतकुमार महाले, किशोर वळवी यांनी केली आहे.

Animal Smuggling
Nandurbar News : गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.